घरमुंबईजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

Subscribe

मेष :- तुमची गरज इतरांना वाटेल. तुमच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याचे समाधान मिळेल. मान-सन्मानात भर पडेल.

वृषभ :- धंद्याला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न करा. परिश्रम घेण्याची तयारी ठेवा. वरिष्ठांना तुमच्याबद्दल आदर वाटेल.

- Advertisement -

मिथुन :- मनाची चंचलता वाढेल. कामाचा व्याप सांभाळ शकाल. मैत्री दृढ होईल.

कर्क :- रस्त्याने चालताना विचारात राहू नका. दुखापत होण्याचा संभव आहे. मनस्ताप व दुःख होईल.

- Advertisement -

सिंह :- घरगुती समस्या सोडवण्यात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वर्चस्व राहील. मुलांच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे लागेल.

कन्या :- टिंगल टवाळी करण्यासाठी मित्रांची संगत मिळेल. कुणाला त्रास होईल असे वर्तन मात्र टाळा.

तूळ :- आनंदाची बातमी मिळेल. कामाची खूप गर्दी होईल. मोठी खरेदी होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक :- मनाची द्विधा अवस्था होईल. मनावर दडपण व चिंता वाटेल. वाहन जपून चालवा.

धनु :- समोरच्या व्यक्तीचे डावपेच लक्षात येतील. लिखाणासाठी नवा विषय मिळेल. कौतुक होईल.

मकर :- तुमच्या अपरोक्ष कट-कारस्थाने करण्याचा प्रयत्न होईल. उसने पैसे मागणारी व्यक्ती त्रस्त करेल.

कुंभ :- व्यवसायात नवा भागिदार घेता येईल. चर्चा सफल होईल. चांगल्या व्यक्तीचा परिचय होईल.

मीन :- समाधान मानून घ्यावे लागेल. क्षुल्लक वादाला महत्त्व देऊ नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -