घरमुंबईभिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 23 वर पोहचला

भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 23 वर पोहचला

Subscribe

मृतांच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती यंत्रणेकडून 4 लाखांची मदत

मृतांच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती यंत्रणेकडून 4 लाखांची मदत

भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 23 जणांचा बळी गेला आहे. तर या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले आहेत. अद्यापी किमान 15 ते 20 जण अडकून पडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दुर्घटना स्थळाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी सकाळी भेट देत येथील बचाव कार्याची पाहणी केली.
एनडीआरएफ,टिडीआरएफ,अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनच्या तुकड्या घटनास्थळी बचाव कार्य करीत असून आजपासून जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने येथील तळ अधिक पहिल्या मजल्याचा ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले. दरम्यान या इमारत दुर्घटनेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना सोमवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर केली होती. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इमारत अधिकृत असल्याबाबतची पडताळणी करून राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून अधिक 4 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार असून जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

- Advertisement -

दरम्यान ही इमारत जुनी असल्याने या दुर्घटनेस नेमकी कोण जबाबदार आहे ? याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल तसेच शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या विकासाबाबत निर्णय घेणे गरजेचे असून वाढीव चटई क्षेत्र मंजूर करणे ,पुनर्वसनाची व्यवस्था करणे या बाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे या घटनेला पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याची चर्चा कालपासून रंगलेली असतांनाच पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी प्रभाग समिती क्र.३ चे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांच्यासह निवृत्त कनिष्ठ अभियंता दुधनाथ यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकास्तरीय चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून येत्या सात दिवसांच्या आत या घटनेसंदर्भात संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -