घरठाणेराज यांच्या अयोध्या भेटीनंतर ठाण्यात भाजप-मनसे युतीचा निर्णय ?

राज यांच्या अयोध्या भेटीनंतर ठाण्यात भाजप-मनसे युतीचा निर्णय ?

Subscribe

पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि मनसे यांची युती झाली होती. मात्र, ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसे आणि भाजप यांच्या युतीचे भवितव्य हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने दिली. तसेच सध्या ठाण्यात मनसे निवडणुकीच्यादृष्टीने तयारीला लागली आहे. जर भाजप आणि मनसे युती झाल्यास या युतीचा कोणाला फायदा होईल हे आताच सांगता येत नाही.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. त्यानुसार पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती झाली. त्यातच आता ठाणे, पुण्यासह नाशिक आदी जिल्ह्यात महापालिकांच्या आगामी निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यातच आघाडी सरकारमधील पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता येत्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

- Advertisement -

त्यातच आता येत्या सहा महिन्यांवर आलेल्या निवडणुकीसाठी मनसे पुन्हा एकदा ठाणे शहरात जोराने कामाला लागली आहे. दुसरीकडे मनसेने भाजप बरोबर जवळीक वाढवण्यास सुरुवात केल्याचेही बोलले जात आहे. तर आता राज्य पातळीवर देखील मनसे आणि भाजपच्या गाठीभेटी वाढू लागल्या असून, याचदरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोमवारी अयोध्या भेटीचे आमंत्रण आले होते. त्या आमंत्रणाला राज ठाकरे यांनी होकार दिल्याचे मनसेच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे. अयोध्या भेट झाल्यानंतरच मनसे- भाजप यांच्या युतीबाबत निर्णय होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी आहे मनसेची ठाण्यात स्थिती
मनसेची स्थापना झाल्यानंतर ठामपामधील पहिल्याच २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे तीन शिलेदार नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच २०१२ मध्ये ती संख्या ७ झाली. त्यावेळी, मनसे ठामपामध्ये किंग मेकर ठरली होती. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत मनसे भुईसपाट झाली. एकही उमेदवार निवडून आला नसल्याने सद्य स्थितीत ठामपामध्ये मनसेचे इंजिन विना डब्ब्याने धावत असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -