घरमुंबई‘अंतर्गत जलवाहतुकीत दिरंगाई’

‘अंतर्गत जलवाहतुकीत दिरंगाई’

Subscribe

कल्याण आणि वसई यादरम्यान 50 किलोमीटर्सच्या अतिशय महत्वाच्या अशा अंतर्गत जलवाहतूक सुरु करण्याच्या संदर्भात शासनाने दिरंगाई केली आहे. माझ्या मतदारसंघातील मतदारांना केवळ रेल्वे आणि रस्ते हेच वाहतूक मार्ग आहेत आणि ते कायम कमी पडत असताना शासनाने जलवाहतुकीला प्राथमिकता द्यायला हवी, असे मत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत मांडले. तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 650 कोटी रुपये मंजूर केले होते. त्याचा विकास प्रकल्प अहवालदेखील तयार झाला होता. लोकसभा निवडणुका आल्यामुळे भूमीपूजन मात्र मार्चमध्येही होऊ शकले नाही. ठाणे महापालिकेने दोन टप्प्यांमध्ये जलवाहतूक प्रस्तावित केली होती. वसई-ठाणे-कल्याण हा पहिला तर ठाणे नवी मुंबई हा दुसरा टप्पा होता. याचा देखील विकास प्रकल्प अहवाल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार होणे अपेक्षित होते. परंतु अजूनही पाहिल्या टप्प्याचेच काम सुरू झालेले नसल्याने आणि रस्ते आणि रेल्वेमार्गाची कोंडी वाढती असल्याने या बाबतीत ताबडतोब कारवाई करण्याची आणि काम सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -