घरमुंबईशासकीय दंत महाविद्यालयात 'सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा' विभाग

शासकीय दंत महाविद्यालयात ‘सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा’ विभाग

Subscribe

तोंडाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 'सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा' म्हणजेच पब्लिक हेल्थ कम्युनिटी डेंटीस्ट्री हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे दातांच्या आरोग्याबाबतची माहिती आता सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.

तोंडाचे आरोग्य कसे जपावे? दातांचे नेमके आजार कोणते? हे अनेकांना माहितच नसते. त्यामुळे दातांच्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळेच शासकीय दंत महाविद्यालयात आपल्या दातांच्या आरोग्याबाबतची माहिती आता सहज उपलब्ध होऊ शकते. कारण, तोंडाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा’ म्हणजेच पब्लिक हेल्थ कम्युनिटी डेंटीस्ट्री हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यासोबतच तोंडाचे आरोग्य कसे राखावे? याबाबत माहिती देणारे छोटेखानी म्युझियमही या विभागात सुरू करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. गिरीष महाजन यांच्या हस्ते येत्या ८ मार्च, २०१९ रोजी या विभागाचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

पब्लिक हेल्थ कम्युनिटी डेंटीस्ट्री या विभागाचा मुख्य उद्देश रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दातांची कशापद्धतीने काळजी घेतली पाहिजे? तसेच, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही दातांचे अनेक विकार असतात. त्यामुळे, शासकीय दंत महाविद्यालयातर्फे ग्रामीण भागातील लोकांच्या दातांच्या समस्येसाठी अनेक शिबीरे घेतली जातात.

- Advertisement -

‘कम्युनिटी डेंटीस्ट्री’ या विभागाद्वारे मौखिक आरोग्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. घराघरात जाऊन मोबाईल व्हॅनद्वारे तपासणी केली जाते. याबाबत आणखी जनजागृती व्हावी यासाठी एका स्वयंसेवी संस्थेशी करार करण्यात आला आहे. त्यानुसार, रुग्णालयातील निवासी डॉक्टर गावखेड्यात जाऊन तेथील अशा सेविकांना मौखिक आरोग्याची माहिती देतात आणि अशा सेविका घरोघरी जाऊन तोंडाच्या आरोग्याची तपासणी करतात. मोबाईल डेंटल व्हॅनद्वारे निवासी डॉक्टर तेथील लोकांच्या तोंडाची तपासणी करत आहेत. यात पालघरमध्ये आयोजित शिबिरात १ हजार ३४६ लोकांची मौखिक तपासणी करण्यात आली होती. यात ५०३ लोकांवर उपचार करण्यात आले आहेत.  – डॉ. संध्या नाईक, शासकीय दंत महाविद्यालयातील सामाजिक दंतशास्त्र विभागाच्या प्रमुख

म्युझियममध्ये विशिष्ट प्रकारचे ‘मॉडेल्स’

‘दातांच्या आरोग्याची माहिती रुग्णांना व्हावी यासाठी म्युझियमही तयार करण्यात आले आहे. या म्युझियममध्ये विशिष्ट प्रकारचे मॉडेल्स ठेवण्यात आले आहेत. दातांना कीड कशी लागते? मौखिक स्वच्छता कशी ठेवावी? दातांची झीज होण्याची कारणं?, दात घासण्याची पद्धत, हिरड्यांच्या आजारांची आणि तंबाखूचे मौखिक आरोग्यावरील दुष्परिणाम याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय रुग्णांना ही माहिती देण्यासाठी या म्युझियममध्ये तृतीय वर्गातील दोन डॉक्टरांना नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासोबतच, दिव्यांग लोकांना ही ट्रिटमेंट मिळणं सोपं होणार असल्याची माहिती शासकीय दंत महाविद्यालयातील सामाजिक दंतशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. संध्या नाईक यांनी दिली आहे.

- Advertisement -

तोंडाचे आणि दातांचे आजार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. विशेषतः मौखिक आरोग्याचा परिणाम शरीराच्या अन्य अवयवांवरही होतो. त्यामुळे तोंडाचे आरोग्य कसे राखावे याबाबत माहिती देण्यासाठी कम्युनिटी डेंटीस्ट्री विभाग सुरू करण्यात आला आहे.  – डॉ. विवेक पाखमोडे, शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता


वाचा – ग्रामीण भागात दंत चिकित्सा पुरवण्याची गरज


 

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -