घरदेश-विदेशदेवरा - निरुपम वाद हायकमांडकडे

देवरा – निरुपम वाद हायकमांडकडे

Subscribe

दिल्लीत लवकरच बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात आता माजी खासदार आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मिलिंद देवरा यांनी अप्रत्यक्षरिता नाराजी व्यक्त केली आहे. आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे वादाची ठिणगी पेटली आहे. दरम्यान, हे प्रकरण सोडविण्यासाठी आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम थेट दिल्ली दरबारी पोहचणार असल्याची माहिती ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे.

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद राज्यासाठी काही नवीन नाही. मुंबई अध्यक्ष संजय निरुमप यांच्याविरोधात दिवगंत खासदार गुरुदास कामत यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी झालेल्या बैठकीतही वाद झाल्याने अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला वाचा फोडली. त्यामुळे नवा पेचप्रसंग उभा राहिला आहे. इतकेच नव्हे तर या वादाला कंटाळून आपण कदाचित लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे धक्कादायक विधानही त्यांनी केले. मात्र आपल्या विधानावर बोलताना काँग्रेसला आपापसातील मतभेद विसरून एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असे देवरा यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तर निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक नसल्याची माहिती देवरा यांनी फोनवरुन दिल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपासून सुरू झालेल्या वादावर पक्षातील नेत्याने समोर येऊन बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. तर दुसरीकडे मिलिंद देवरा यांनी पक्षबांधणीबाबत चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एका सकारात्मक विचारसरणीने या देशातील युवानेता जोडले गेले आहेत. त्यामुळे सध्या आपापसातील नाराजी विसरून मोदी सरकारविरोधात कसा लढा देता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे, असेही देवरा म्हणाले. तर याप्रकरणी संजय निरुपम यांच्याकडे विचारणा केली असता हा आमच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न असून यावर मी जास्त भाष्य करणार नाही. परंतु हा प्रश्न लवकरच दिल्लीतील फोरममध्ये ठेवण्यात येणार आहे. तेथे नक्कीच याबाबत अंतिम मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.

त्या बैठकीत नेमके काय झाले
दरम्यान, एकीकडे निरुपम आणि देवरा यांच्यातील वादाविषयी मंगळवारी दिवसभर वादळी चर्चा होत असतानाच या दोघांची काही दिवसांपूर्वीच मुंबईत एक विशेष बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चादेखील झाली आहे. या बैठकीत अंतर्गत वादावरही चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -