घरमुंबईफडणवीसांनी चालवली बिल्डरची गाडी; काँग्रेसच्या ट्विटने खळबळ

फडणवीसांनी चालवली बिल्डरची गाडी; काँग्रेसच्या ट्विटने खळबळ

Subscribe

या पाहाणी दौऱ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. तर काँग्रेसने ट्विट करत खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी बिल्डरची गाडी चालवली, मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का?, असा सवाल काँग्रेसने ट्विटमध्ये केला. मात्र ही गाडी कोणत्या बिल्डरची आहे, याबाबत खुलासा ट्विटमध्ये करण्यात आलेला नाही. या ट्विटने चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी समृद्धी महामार्गाची पाहाणी केली. या महामार्गाचे कौतुकही झाले. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या मार्गावर गाडी चालवली. प्रवासाच्या अनुभवाचे फडणवीस यांनी कथन केले. फडणवीस यांनी चालवलेली गाडी बिल्डरची होती, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या समृद्धी महामार्ग पाहाणी दौऱ्याची चर्चा रविवारी दिवसभर सुरु होती. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री एका गाडीत बसले होते. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेअरिंग हातात घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या. नागपूर ते शिर्डी या मार्गावर ५२९ किमीचा प्रवास त्यांनी केला. उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी १५० किमी वेगाने गाडी चालवली. त्याचेही कौतुक झाले.

- Advertisement -

या पाहाणी दौऱ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. तर काँग्रेसने ट्विट करत खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी बिल्डरची गाडी चालवली, मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का?, असा सवाल काँग्रेसने ट्विटमध्ये केला. मात्र ही गाडी कोणत्या बिल्डरची आहे, याबाबत खुलासा ट्विटमध्ये करण्यात आलेला नाही. या ट्विटने चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी चालवलेल्या गाडीची किंमत कोट्यवधी रुपये आहे. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या ताफ्यात सहजपणे कोणतीही गाडी येऊ शकत नाही. त्यामुळे ही गाडी कोणी आणली?, कशासाठी आणली?, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती गाडी का चालवली, असे प्रश्न उपस्थितीत होतात. कारण उप मुख्यमंत्री सहजासहजी अशी कोणाची गाडी चालवणार नाहीत.

त्यामुळे काँग्रेसने केलेल्या ट्विटने अनेक प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. तसेच काँग्रेसच्या ट्विटला शिंदे-फडणवीस सरकारला उतर तर द्यावे लागेल. गेले काही दिवस शिंदे-फडणवीस सरकार व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. काँग्रेसच्या ट्विटने नवीन वाद होण्याची चिन्हे आहेत.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -