घरमुंबईअपक्षांसह काँग्रेस, बहुजन आघाडी, मनसे, राष्ट्रवादी, आप, वंचितच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त

अपक्षांसह काँग्रेस, बहुजन आघाडी, मनसे, राष्ट्रवादी, आप, वंचितच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त

Subscribe

ठाणे जिल्ह्यात झालेल्या 18 विधानसभा मतदारसंघात भाजप- 8, शिवसेना-5, राष्ट्रवादी-2, मनसे -1, सपा-1, आणि अपक्ष-1 अशा 18 उमेदवारांनी विजय मिळवला. या 18 विधानसभा निवडणुकीत अपक्षासह काँग्रेस, बहुजन आघाडी, मनसे, राष्ट्रवादी, आप,वंचित आघाडीच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली आहेत.

भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून ठाणे जिल्ह्यात विजय मिळवलेल्या उमेदवारात मंदा म्हात्रे ( बेलापूर ) गणेश नाईक ( ऐरोली ), संजय केळकर ( ठाणे शहर ),गणपत गायकवाड़ ( कल्याण पूर्व ), महेश चौगुले ( भिवंडी पश्चिम, ), किसन कथोरे( मुरबाड ), रविंद्र चव्हाण ( डोंबिवली ), कुमार आयलानी ( उल्हासनगर ) यांचा समावेश असून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे ( कोपरी पाचपाखडी ), प्रताप सरनाईक ( ओवळा माजिवडा ), शांताराम मोरे ( भिवंडी ग्रामीण ), विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम ), बालाजी किणीकर ( अंबरनाथ ) यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड ( कळवा मुंब्रा ), दौलत दरोडा (शहापूर ), मनसेच्या प्रमोद उर्फ राजू पाटील(कल्याण ग्रामीण), आणि समाजवादी पार्टीचे रहिस शेख ( भिवंडी पूर्व ) आणि अपक्ष उमेवार गीता जैन ( मीरा भाईंदर ) यांचा समावेश आहे.

- Advertisement -

या निवडणुकीत 18 विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारांसह काँग्रेस, बहुजन आघाडी, मनसे, राष्ट्रवादी, आप आणि वंचित आघाडीच्या उमेदवरांची डिपॉझिट जप्त झालेली आहेत. यात कल्याण पश्चिम भागात काँग्रेसच्या उमेदवार कंचन कुलकर्णी यांनी 11 हजार 539 मते मिळवली त्यांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपक खांबेकर (मुरबाड), कल्याण पूर्व मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या अश्विनी थोरात यांना 12 हजार 899 मते मिळाली, तर डोंबवलीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार राधिका गुप्ते यांना 6 हजार 604 मते मिळाली.

कल्याण ग्रामीणमधील वंचित बहुजन आघाडीमध्ये अमोल केंद्रे यांनी 6 हजार 199 मते मिळवली, भिलवली पश्चिममधील मनसेचे उमेदवार नागेश मुकादम यांना 2 हजार 597 मते मिळाली, भिवंडी पूर्व मतदारसंघातील मनसे उमेदवार मनोज गुळवी यांनी 1472 मते मिळविली आहेत. अंबरनाथ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण खरात यांनी 3 हजार 323 मते मिळवली. मीरा-भायंदर मधील मनसे हरेश सुतार यांनी 3 हजार 136, आम आदमी पार्टीच्या नरेंद्र भाम्बवानी यांनी 2 हजार 24 मते मिळवली, तर ओवळा माजिवडा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किशोर दिवेकर यांनी 6 हजार 481 मते मिळवली. मात्र या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जिल्ह्यातून जप्त झालेली आहेत. यात राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनाही नामुष्की पत्करावी लागलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -