घरमुंबईनाशिक जिल्ह्याला अधिक निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

नाशिक जिल्ह्याला अधिक निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

Subscribe

संकटात मजबुतीने एकत्र उभे राहिलो: जयंत पाटील

जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या (डीपीडीसी) माध्यमातून नाशिक जिल्ह्याला जास्तीचा निधी दिला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली. राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष पॅकेज दिले असून असंघटित कामगारांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे पवार म्हणाले. मालेगावचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आज कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते.

पवारसाहेबांनी आपल्या राजकीय जीवनात अठरापगड जातींना घेऊन काम केले आणि करत आहेत.ही आपलेपणाची भावना राष्ट्रवादी काँग्रेस ठेवत आल्याने आज आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आसिफ शेख यांच्या काही अडचणी होत्या. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या लोकांची राष्ट्रवादीशी नाळ जोडलेली आहे. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव दिला आहे,असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

संकटात मजबुतीने एकत्र उभे राहिलो: जयंत पाटील

गेल्या २१ वर्षात राष्ट्रवादीवर अनेक संकटे आली. मात्र मजबुतीने आम्ही एकत्र राहिलो आहोत. गेल्या पाच वर्षात आम्ही आमच्या अडचणीमुळे सत्तेत जात असल्याचे काही लोक सांगून पक्ष सोडून गेले.मात्र पक्ष आज सत्तेत आला आहे, याची आठवण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करुन दिली. कोरोना काळात मालेगावमधील सर्वांना आसिफ शेख यांनी विश्वासात घेऊन प्रवेश घेतला आहे. मालेगावमधील लोकांना पवारसाहेबांच्या कामावर विश्वास आहे. मालेगाव नगरपालिकेत ज्या समस्या आहेत त्याची कल्पना आम्हाला दिली आहे,असेही पाटील यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांची टीका

भाजप सत्तेत येण्यासाठी माशासारखे तडफडत आहेत, अशी टीका अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केला. तुम्ही राष्ट्रवादीत आला त्याचे दु:ख बाळगू नका. पक्ष तुम्हाला ताकद देणार आहे. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करु,असे आश्वासन भुजबळ यांनी दिले. तर आसिफ शेख यांनी नाशिक जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत करण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, युसुफ अली, यासिन मोमिन , मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले आदी उपस्थित होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -