मुंबईतील टिळक नगरमध्ये यूपीच्या पर्यटन विभागाच्या उपसंचालकाची आत्महत्या

उत्तर प्रदेश सरकारमधील पर्यटन विभागाच्या उपसंचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील टिळक नगरमध्ये या उपसंचालकाने आत्महत्या केली आहे. विमलेश औदिच्य असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

उत्तर प्रदेश सरकारमधील पर्यटन विभागाच्या उपसंचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील टिळक नगरमध्ये या उपसंचालकाने आत्महत्या केली आहे. विमलेश औदिच्य असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. (Deputy Director Of Up Tourism Department Vimlesh Audichya Committed Suicide In Mumbai Today)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील टिळकनगर परिसरात असलेल्या एका इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई पोलिसांची टीम दाखल झाली आहे.

दरम्यान, विमलेश औदिच्य हे लखनौतील पर्यटन मंत्रालयात उपसंचालकपदी कार्यरत आहेत. तसेच, विमलेश औदिच्य हे डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार होते. परंतु, मंगळवारी विमलेश हे मुंबईतील निवासस्थानी आले होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास 12 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

विमलेश यांनी टोकाचं पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. उत्तर प्रदेशमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार विमलेश हे विभागीय प्रमुखाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळले होते. असे असले तरी या घटनेबाबत मुंबई पोलीसांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.


हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून ‘त्या’ शिवसैनिकांची हकालपट्टी; वाचा नेमके प्रकरण काय?