घरताज्या घडामोडीठाकरे सरकार पळपुटे

ठाकरे सरकार पळपुटे

Subscribe

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र, काळी कामे करून सरकार कोरोना मागे लपते

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे पळपुटे सरकार आहे. या सरकारच्या काळातच बलात्कार, गुन्हे वाढले. आता तर हे सरकार विद्यापीठांनाच युवासेनेचे अड्डे बनविण्याचे काम करत आहे. नव्या विद्यापीठ कायद्याने कुलगुरूपदाचाच लिलाव होईल. एका बाजूला केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार भ्रष्टाचार मुक्त काम करत आहे. तर ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार युक्त कारभार सुरू असल्याची चौफेर टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली.

महाविकास आघाडी सरकार काळी कामे करते आणि कोविडच्या मागे लपते. कोरोना नाही असे नाही; पण सरकारच्या कामांना कोरोना नसतो.जेव्हा काळी कामे सरकार करते आणि त्याविरोधात आवाज उठविला जातो तेव्हा यांना कोरोना आठवतो, असा सणसणीत टोलाही फडणवीस यांनी लगावला. मुंबईत आज भाजपच्या युवा कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारने आणलेला विद्यापीठ कायदा हा काळा कायदा आहे. त्यामुळे येत्या काळात कुलगुरूपदाचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचे पवित्र क्षेत्र अपवित्र होईल. विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनविण्याचे काम सुरू आहे. हे पिढ्या बरबाद करण्याचे षड्यंत्र आहे.आपण जर या विरोधात आज लढलो नाही तर येत्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. ज्यावेळी आमची विद्यापीठे विकली जात होती, राजकारणाचे अड्डे बनत होती तेव्हा तुम्ही काय करत होतात? असा सवाल ते विचारतील, असेही फडणवीस म्हणाले.

आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्याचे विधेयक अवैधरितीने मंजूर केले. काळे काम करणारे हे विधेयक मंजूर करण्यात आले. यांच्या विरोधात आता रस्त्यावर उतरणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले.

- Advertisement -

नया है वह!- सत्तारांची उडवली खिल्ली
शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत केलेल्या विधानाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. नया है वह, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांचं म्हणणं उडवून लावलं आहे. नितीन गडकरी आमचे मोठे नेते आहेत. ते युती घडवून आणू शकतात, असे सत्तारांना वाटते याचा मला अतिशय आनंद आहे. पण अब्दुल सत्तार ‘नया है वह’. त्यांना काय माहीत आहे शिवसेना. काहीच माहीत नाही सेनेचे. मला तर असे वाटते की, गेल्या पाच सात महिन्यात ते कधी उद्धवजींना भेटलेही नसतील. युतीबाबत बोलायला कोणी महत्वाचा माणूस लागतो ना, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -