धारावीत कोरोनाचे २५ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या २१४ वर; एकाचा मृत्यू

धारावीत आज नवे २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या २१४ वर गेली आहे. तर आज एकाचा मृत्यू झाला आहे.

7 new corona positive patient found in dharavi mumbai
धारावीत कोरोनाचा वेग मंदावला; दिवसभरात अवघे ७ रुग्ण आढळले

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शहरात दिवसाला कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यात चिंतेची भर म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून आज पुन्हा २५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या २१४ वर गेली आहे. तर दुसरीकडे माहीमध्ये ६ नवे रुग्ण आढळले आहेत.

महापालिकेच्या जी-उत्तर विभागांमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या २६० एवढी झाली आहे. यापैकी धारावीत २१४, माहिममध्ये २४ आणि दादरमध्ये २८ कोरोनाग्रस्तांचा समावेश आहे. माटुंगा लेबर कॅम्प व ९० फुटी रस्ता येथे प्रत्येकी ३ रुग्ण, आणि धारावी आझादनगर, मुकुंद नगर येथे प्रत्येकी दोन रुग्ण. तसेच धारावीत कुट्टीवाडी,  इंदिरानगर,धारावी आझादनगर, पिवळा बंगला, संत ककय्या मार्ग, धारावी क्रॉस रोड,  कुंभार वाडा, मुकुंद नगर, कल्याणवाडी, धारावी चाळ, राजीव गांधी नगर,  इंदिरा नगर,  कुचिकोरवे नगर,  शास्त्री नगर, नेताजी सोसायटी आदी ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. यापैकी शास्त्री नगरमधील ६९ वर्षी पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

माहिममध्ये आढळले ६ रुग्ण

माहिममध्ये आज सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका १३ वर्षीय मुलीलाचा समावेश असून चार महिला आणि दोन पुरुषांचाही यात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे माहिमची कोरोनाबाधितांची संख्या आता २४ वर गेली आहे. तर दुसरीकडे दादरमध्येही कोरोनाचा एक रुग्ण सापडला असून आता दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या २८ वर गेली आहे.

दादर-माहिमसाठी स्वतंत्र सहायक आयुक्त द्या

जी-उत्तर विभागात धारावी, दादर आणि माहिम असे विभाग येत असून धारावीमध्ये सध्या झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे धारावीकडे सर्वांचे लक्ष आहे. किंबहुना येथील रुग्ण संख्या कमी करण्याकडे प्रशासन विशेष मेहनत घेत आहे. त्यामुळे जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांचे लक्ष हे धारावीकडेच असून सध्या दादर आणि माहिमची संख्या नियंत्रणात असली तरी या दुर्लक्षामुळे ही संख्या वाढण्याची भीती शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे माहिम विधानसभा क्षेत्राकरता स्वतंत्र आरोग्य यंत्रणा व सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. माहिम आणि दादरमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्यादृष्टीकोनातून उपाययोजना वेळीच होत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून प्राप्त होत आहे. त्यामुळे आमदार सरवणकर यांनी ही मागणी करत या विधानसभा क्षेत्राकरता स्वतंत्र आरोग्य यंत्रणा व सहायक आयुक्त पद दर्जाचा समक्ष अधिकाऱ्याची तातडीने नेमणूक करण्याची मागणी केली आहे.


हेही वाचा – वांद्र्याची गर्दी हे राज्य सरकारविरोधात षडयंत्र; संजय राऊत