घरताज्या घडामोडीधक्कादायक! कर्मचाऱ्यांच्या अंगावर स्प्रे मारुन केले निर्जंतुकीकरण

धक्कादायक! कर्मचाऱ्यांच्या अंगावर स्प्रे मारुन केले निर्जंतुकीकरण

Subscribe

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कंत्राटदारानेच कर्मचाऱ्यांना निर्जंतुक करण्यासाठी स्प्रे मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कंत्राटदारानेच कर्मचाऱ्यांना निर्जंतुक करण्यासाठी स्प्रे मारण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. कर्मचाऱ्यांना डोळे बंद करायला सांगत सर्रासपणे केमिकल मिश्रित स्प्रे करण्यात आल्याचा प्रकार एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्यानंतर एमएमआरडीएनेच संपूर्ण प्रकरणात सारवासारव करत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण, तोवर अनेक कर्मचाऱ्यांवर हा स्प्रे करण्याचा प्रकार संपला होता. एमएमआरडीएने या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत कंत्राटदाराला अशी पुनरावृ्त्ती करू नये, असे बजावले आहे.

चेहऱ्यावरही या स्प्रेचा शिडकाव

कोरोनाच्या संकटात सूट मिळालेल्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांमध्ये एमएमआरडीएने वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कामाला सुरूवात केली होती. मॉन्सूनपूर्व कामात या एक्सप्रेस हायवेची देखभाली दुरूस्तीच्या कामादरम्यान हा प्रकार घडला आहे. एमएमआरडीएने नेमलेल्या कंत्राटदाराने कामावर उपस्थित कामगारांना डोळे बंद करून उभ रहायला सांगितले. त्यानंतर निर्जंतुक करण्यासाठी केमिकल असलेला स्प्रे एकापाठोपाठ यापद्धतीने काही कामगारांवर फवारण्यात आला. कामगारांच्या अंगावर तसेच चेहऱ्यावरही या स्प्रेचा शिडकाव करण्यात आला. रस्ते दुरूस्तीच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या अवजारांवरही स्प्रे करण्यात आला. या संपूर्ण प्रकारामध्ये कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागला. कंत्राटदारच अंगावर स्प्रे करण्याच्या सूचना करत असल्याने कामगारांनीही या प्रकाराला विरोध केला नाही. या प्रकारावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कंत्राटदाराने नियमित वापरातल्या सॅनिटायजर्सचा वापर केला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांवर स्प्रे करण्याच्या प्रकारावर कंत्राटदाराकडून चूक झाल्याची कबुली एमएमआरडीच्या वतीने देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाबाबत खुद्द एमएमआरडीएच्या आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त करत या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आहे. यापुढच्या काळात कोणत्याही कंत्राटदाराने केमिकल स्प्रे करण्याच्या प्रकार करू नये, असेही त्यांनी कंत्राटदारांना बजावले आहे.


हेही वाचा – वीजपुरवठा खंडित झाल्यास ‘या’ क्रमांकावर द्या ‘मिस कॉल’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -