घरमुंबईडॉक्टर आणि रुग्णांमधील नाते घट्ट होणार

डॉक्टर आणि रुग्णांमधील नाते घट्ट होणार

Subscribe

‘डिअर पीपल, वुइथ लव्ह अँड केअर, युवर डॉक्टर्स’ पुस्तक प्रकाशन

गेल्या काही वर्षांपासून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नात्याला तडा गेला आहे. शिवाय, डॉक्टरांवर वाढत्या हल्ल्यांमुळे डॉक्टर आणि रुग्णांच्या नात्यातील विश्वास कमी झाला आहे. आजच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून माहिती उपलब्ध होते. त्यामुळे रुग्ण दुसऱ्या डॉक्टरांकडून सहज मत जाणून घेऊ शकतात, निदान करतात आणि उपचारही करतात. पण, सुसंवाद आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णामधील नाते घट्ट होणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने डॉ. देबराज शोम आणि डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी ‘डिअर पीपल, वुइथ लव्ह अँड केअर, युवर डॉक्टर्स’ हे पुस्तक लिहलं आहे. ज्यातून त्यांनी डॉक्टर-रुग्ण यांच्यातील नात्याची वीण घट्ट करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. देबब्रत ऑरो फाउंडेशन या संस्थेतर्फे पोईसर येथे आयोजित भव्य आरोग्य शिबिरात आमदार श्री. अतुल भातखळकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

आरोग्यक्षेत्राचा चेहरामोहरा बदलला

फेशिअल प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन आणि देबब्रत ऑरो फाउंडेशनचे सहसंस्थापक आणि संचालक डॉ. देबराज शोम यांनी सांगितंल, “ अलीकडील काळात डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या किंवा हॉस्पिटलची नासधूस केल्याच्या अत्यंत नकारात्मक बातम्या आपल्या कानावर येतात. अशा प्रकारचे वातावरण डॉक्टर आणि रुग्ण अशा दोघांसाठी सुद्धा नकारात्मक आहे आणि हे एक कटू सत्य आहे. पण, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जगभरात वैद्यकीय चमत्कार घडत आहे आणि त्यामुळे आरोग्यक्षेत्राचा चेहरामोहरा बदलत आहे, हे आपण विसरत आहोत. आधुनिक विज्ञानामुळे गेल्या काही वर्षांत आयुर्मानामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ”

- Advertisement -

तंत्रज्ञानामुळे डॉक्टर-रुग्ण यांच्यातील नात्यात दुरावा

एके काळी डॉक्टरांना देवा समान मानले जात होते. त्यांच्या स्टेथोस्कोपला पण आदर दिला जात होता. पण, आता परिस्थितीत बदल झाला आहे. तंत्रज्ञानाच्या हस्तक्षेपामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नात्यात दुरावा आला आहे असं बॅरिअॅट्रिक सर्जन आणि देबब्रत ऑरो फाउंडेशनच्या सहसंस्थापक व संचालक डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -