घरमुंबईदुर्मिळ! यकृत दानातून वाचवले एकमेकांच्या पतीचे प्राण

दुर्मिळ! यकृत दानातून वाचवले एकमेकांच्या पतीचे प्राण

Subscribe

मुंबईतील ५५ वर्षीय डॉक्टर आणि कोल्हापूरातील ३६ वर्षीय शेतकरी यांच्यावर सर.एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये यशश्वी स्वॅप पद्धतीने यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

एखाद्या यशस्वी आणि निरोगी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते हे पुन्हा एकदा मुंबईतील आणि एका खेड्यात राहणाऱ्या महिलेने त्यांनी केलेल्या अवयवदानातून दाखवून दिलं आहे. मुंबईतील ५५ वर्षीय डॉक्टर आणि कोल्हापूरातील ३६ वर्षीय शेतकरी यांच्यावर सर.एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये यशश्वी स्वॅप पद्धतीने यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

यकृत निकामी झाल्याने प्रकृती गंभीर असलेल्या या दोन्ही व्यक्तींना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता होती. पण, दोघांच्याही थेट नातेवाईकांमध्ये एकही दाता जुळत नव्हता. पण, अखेर दोघांच्या पत्नीने यकृतातील काही भाग दान करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टरांच्या पत्नीने कोल्हापूरातील शेतकऱ्याला तर, शेतकऱ्याची पत्नीने डॉक्टरांसाठी यकृत दान केलं. अशा रीतीने थेट नातलगांऐवजी देवाणघेवाणच्या माध्यमातून यकृत प्रत्यारोपण करण्याची ही मुंबईतील तिसरी घटना आहे.

- Advertisement -

नेमकं काय घडलं ?

मुंबईतील स्थायिक डॉ. आतम यांना यकृताचा कर्करोग झाला होता. प्रत्यारोपण एकच पर्याय असल्याचे रिलायन्स फाऊंडेशनमधील डॉक्टरांनी सांगितलं होते. त्यांच्या पत्नीची यकृतदान करण्याची इच्छा असूनही जुळत नसल्याने प्रत्यारोपण करणे शक्य नव्हते. दरम्यान, कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील ३६ वर्षीय बिकाराम यांना प्रकृती गंभीर असल्याने रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांचेही यकृत निकामी झाल्याने तातडीने प्रत्यारोपण करणं गरजेचं होतं. पण, त्यांच्याही पत्नी किंवा थेट नातेवाईकांचे रक्तगट, यकृताचा आकार या बाबी जुळत नसल्याने अगदी बिकाराम यांचे प्राण कसे वाचवावे, असा प्रश्न डॉक्टरांपुढे निर्माण झाला होता.

डॉ. आतम आणि बिकाराम यांच्यामध्ये देवाणघेवाण (स्वॅप) पद्धतीने प्रत्यारोपण होऊ शकते का हा पर्याय शोधला आणि आश्चर्य म्हणजे दोघांच्याही पत्नीच्या रक्तगटासह सर्व बाबी जुळून आल्या. पण, त्यानंतर खरे कठीण काम होते ते म्हणजे एकाच वेळी चारही शस्त्रक्रिया करणे. ६ ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये चार शस्त्रकिया एकाच वेळी करण्यात आल्या.
बिकाराम यांच्या पत्नीच्या यकृताचा भाग डॉ. आतम यांना तर डॉक्टरांच्या पत्नीच्या यकृताचा काही भाग बिकाराम यांच्यामध्ये प्रत्यारोपित केला गेला. दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून दोघांनाही घरीदेखील सोडण्यात आल्याचे डॉ. चेतन भट यांनी सांगितले. यकृत सर्जन डॉ. सोईन यांच्या नेतृत्वाखाली यकृत प्रत्यारोपण टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे.

- Advertisement -

८६ रुग्णांमध्ये यकृत प्रत्यारोपण

मुंबईत यापूर्वी दोन वेळा असे प्रत्यारोपण केले आहे. याआधी दिल्लीत ८६ रुग्णांमध्ये ४३ देवाणघेवाण पद्धतीने यकृत प्रत्यारोपण केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे यकृत अदलाबदलचा अल्गोरिदम तयार केला जात आहे. त्यामुळे रुग्णांशी जुळत्या दात्याचा शोध घेणे सोपे होऊन अधिकाधिक प्रत्यारोपण केले जाईल. तसंच विविध शहर, हॉस्पिटलमध्ये देखील देवाणघेवाण पद्धतीने प्रत्यारोपण करता येईल का याचाही विचार केला जात आहे.  – डॉ. ए.एस. सोईन, प्रसिद्ध यकृत सर्जन


हेही वाचा – बहिणीने केले भावाला यकृत दान


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -