घरताज्या घडामोडीवरळी गॅस सिलिंडर स्फोट दुर्घटना ; संबंधित डॉक्टर बडतर्फ, नर्स निलंबित

वरळी गॅस सिलिंडर स्फोट दुर्घटना ; संबंधित डॉक्टर बडतर्फ, नर्स निलंबित

Subscribe

चौकशीतून उपचारात दिरंगाई व हलगर्जीपणा झाल्याचे समोर

वरळी बीडीडी चाळ येथे ३० नोव्हेंबर रोजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील ४ जण जखमी झाले होते. त्यानंतर त्यापैकी गंभीर जखमी चार महिन्याच्या मुलाचा मंगेश पुरी, त्याची आई विद्या पुरी (२५) आणि वडिल आनंद पुरी (२७) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र नायर रुग्णालयात सदर जखमींना उपचार देण्यात झालेल्या दिरंगाईंप्रकरणी पालिका प्रशासनाने सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात १ डिसेंबरपासून दोषी डॉ. शशांक झा यांना बडतर्फ करण्याचे आणि नर्स प्रीती सुर्वे यांना निलंबित करून त्यांची त्रयस्थ चौकशी समिती आणि खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, या एकूण प्रकरणाची सखोल चौकशी ७ दिवसांत पूर्ण करण्यासाठी ४ डिसेंबर रोजी डॉ. अजय चंदेनवाले, सह संचालक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रयस्थ समितीने १३ व १४ डिसेंबर रोजी नायर रूग्णालय येथे आपली प्राथमिक चौकशीची सुनावणी पूर्ण केली आहे. त्याचा चौकशी अहवाल अद्याप प्रतिक्षाधिन आहे. हा अहवाल पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यावर संबंधित दोषींवर ठोस व कडक कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

घटनाक्रमानुसार उपचारात दिरंगाई

३० नोव्हेंबर रोजी घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यावर सदर घटनेत जखमी चार जणांना नायर रुग्णालयात सकाळी ६.११ वाजता आणण्यात आले. मात्र तेव्हापासून तज्ञ डॉक्टर येईपर्यंत जे काही प्राथमिक उपचार तातडीने देणे आवश्यक होते त्यात काही प्रमाणात दिरंगाईं झाल्याचे चौकशी अहवालात मान्य करण्यात आले आहे.

त्या चार जणांना संपूर्ण उपचार देण्यासाठी सकाळी ८.२२ वाजले. सकाळी ६.५३ वाजता संबंधीत डॉक्टरांनी जखमी महिलेला तपासून ड्रेसिंग रूममध्ये पाठवले. दरम्यान, जखमी लहान मुलांना सिरप पाजण्याची सुचना सकाळी ६.१८ वाजता संबंधित डॉक्टर यांनी नर्सला दिली. सकाळी ७.२० वाजता जखमी आनंद पुरी यांना नर्सने आयव्ही लाईन लावली. चौकशीसाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून घेण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – वरळी गॅस सिलेंडर स्फोट दुर्घटना ; ‘ त्या’ लहान मुलाच्या आईचाही मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -