घरमुंबईडॉक्टर्स डे : कल्याणमध्ये १९० डॉक्टरांनी केले रुग्णांसाठी रक्तदान

डॉक्टर्स डे : कल्याणमध्ये १९० डॉक्टरांनी केले रुग्णांसाठी रक्तदान

Subscribe

कल्याण आयएमएतर्फे स्प्रिंगटाईम क्लबमध्ये आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये अनेक डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

सध्याच्या काळात डॉक्टर आणि रुग्णांमध्ये वाढत चाललेली दरी मिटवण्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या कल्याण शाखेने घेतलेल्या पुढाकाराचे निश्चितच कौतुक केले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना भेडसावणारा रक्ताचा तुटवडा पाहता कल्याण आयएमएच्या तब्बल १९० डॉक्टरांनी स्वतः रक्तदान करत एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. निमित्त होते ते ‘डॉक्टर्स डे’चे.

blood donate
कल्याणमध्ये रक्तदान

कल्याण आयएमएतर्फे स्प्रिंगटाईम क्लबमध्ये आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये अनेक डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्यातही डॉ. प्रदीप बलिगा यांची रक्तदान करण्याची १२५ वी वेळ होती. त्याच जोडीला समाजातील जागरूक नागरिक, प्रतिष्ठीत उद्योजक, व्यावसायिक, अधिकारी आणि मान्यवर मंडळीही या श्रेष्ठ कार्यासाठी एकत्र आली होती. तसेच कल्याण रनर्स ग्रुप, तळवळकर्स जिम ८ ची बॅच, जायंटस् ग्रुप आदी सामाजिक संस्थाच्या ४०८ लोकांनी डॉक्टरांच्या या समाजोपयोगी कार्यामध्ये सहभागी होत रक्तदान केल्याची माहिती कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. समाजासाठी आपणही काहीतरी देणं लागतो आणि यातूनच गेल्या २७ वर्षांपासून आम्ही हा रक्तदानाचा उपक्रम राबवत असल्याचे डॉ. पाटील म्हणाले. या रक्तदान शिबिरात जमा होणारे रक्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयातील अर्पण रक्तपेढीला उपलब्ध करून दिले जाणार आहे. अर्पण ब्लड बँकेच्या ४५ सहकाऱ्यांच्या मदतीने हे शिबीर भरवण्यात आले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. प्रदीपकुमार सांगळे, प्रोजेक्ट लीडर डॉ. इशा पानसरे यांच्यासह कल्याण आयएमएच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली.

- Advertisement -
blood donate
कल्याणमध्ये रक्तदान

समाजातील इतर प्रमूख क्षेत्रांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातील काही अपप्रवृत्तीमुळे सर्व जणांकडे संशयाने बघितले जाते. मात्र कल्याण ‘आयएमए’च्या डॉक्टरांनी पुढे येत हे नकारात्मक चित्र बदलण्यासाठी पाऊलं उचलली आहेत. एखाद्या डॉक्टरने रुग्णांसाठी रक्तदान करावे यापेक्षा वैद्यकीय क्षेत्रातील मोठी गोष्ट काय असू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -