घरमुंबईपक्षीप्रेमींसाठी भारतातील पक्ष्यांच्या माहितीचा खजिना

पक्षीप्रेमींसाठी भारतातील पक्ष्यांच्या माहितीचा खजिना

Subscribe

डॉ. सलीम अली यांचे 'दि बुक ऑफ इंडियन बर्ड' या पुस्तकाची आता मराठी आवृत्ती लवकरच पक्षीप्रेमी आणि वाचकांच्या भेटीस येणार आहे. तब्बल ७७ वर्षानंतर मराठी आवृत्ती येत आहे.

ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या ‘दि बुक ऑफ इंडियन बर्ड’ या पुस्तकाच्या एकूण १३ आवृत्त्या आल्या आहेत. मात्र आता पर्यंत या आवृत्त्या इंग्रजी भाषेत उपलब्ध होत्या. मात्र या पुस्तकाची मराठी आवृत्ती पक्षीप्रेमी आणि वाचकांच्या भेटीस येणार आहे. पक्षी निरीक्षक अरुण जोशी यांनी ‘दि बुक ऑफ इंडियन बर्ड’ या पुस्तकाचे मराठीत अनुवाद केला आहे. ‘भारतातील पक्षी’ असे नाव असलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता हॉर्नबिल हाऊस, शहीद भगतसिंग रोड येथे होणार आहे. या कार्यक्रमाला आयएएस अधिकारी विकास खारगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

the-book-of-indian-birds-original-imaf7ywyuh7zsbmk
या पुस्तकाची आता येणार मराठी आवृत्ती

७७ वर्षानंतर येणार मराठी आवृत्ती

‘दि बुक ऑफ इंडियन बर्ड’ हे पुस्तक १९४१ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झाले होते. त्यानंतर तब्बल ७७ वर्षानंतर आता या पुस्तकाची मराठीत उपलब्ध होणार आहे. या मूळ पुस्तकाच्या आजवर एकूण १५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या असून २००९ मध्ये याचा हिंदीत अनुवाद झाला होता. आता मराठीत देखील या पुस्तकाचा अनुवाद होणार आहे. ‘भारतातील पक्षी’ या पुस्तकानिमित्ताने मराठी पक्षी निरीक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी माहितीचा खजिना खुला होणार आहे.

- Advertisement -

डॉ. सलीम अली यांच्याविषयी

डॉ. सलीम अली हे पक्षी – विज्ञानाच्या क्षेत्रात जेवढे कार्यप्रवण होते. तितकेच निसर्गसंबर्धनाच्या क्षेत्रातही होते. त्यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला होता. तसेच देशातील फारशा परिचित नसलेल्या प्रदेशांतही त्यांनी अभ्यासाच्या निमित्ताने भेटी दिल्या होत्या. त्यामुळे तेथील पक्षीजीवन आणि जंगलांचा परिसर यांचा त्यांना सूक्ष्मतम परिचय झाला होता. त्यांनी आपल्या देशातील पक्षांचा देशबांधवांना आणि जगाला परिचय देण्यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले होते.


संबंधित बातम्या – 

वाचा – संभाजी महाराज दारूच्या नशेत; ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तकात उल्लेख

- Advertisement -

वाचा – ‘या’ पुस्तकातून उलगडणार लता दीदींचा जीवनप्रवास!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -