घरताज्या घडामोडीCoronaVirus: अन्नदानासाठी अनेक दात्यांचे हात पुढे सरसावले

CoronaVirus: अन्नदानासाठी अनेक दात्यांचे हात पुढे सरसावले

Subscribe

सामाजिक संस्थांसह नगरसेवक,आमदारांकडून गरजू, आणि निराधार लोकांना अन्नवाटप करण्यात आले.

‘कोरोना’ विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण मुंबईत लॉकडाऊन केल्यामुळे अनेक गरीब, गरजू आणि निराधार लोकांची दोन वेळच्या जेवणाची परवड सुरू झाली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांची होणारी परवड लक्षात घेता, त्यांच्या मदतीसाठी अनेक अन्नदात्यांचे हात पुढे सारसावले आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईतील अनेक भागांमध्ये विविध पक्षांचे नगरसेवक आणि आमदार आपापल्या परिने अन्नवाटप करण्यास सुरुवात करत गरीबांच्या पोटाची भूख शमवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गरीब, गरजू, निराधार तसेच गरजवंत संघटीत कामगारांसाठी भाजपचे मुलुंडमधील नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी रविवारपासून अन्नवाटपाला सुरुवात केली आहे. मुलुंड पश्चिम येथील गणेश गावडे मार्गावरील भाजपच्या कार्यालयामध्ये अन्नवाटपाला रविवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये सुरुवातीला ५०० पाकिटे जेवणाची उपलब्ध करून देण्यात येणार असून भविष्यात १ हजार लोकांसाठी अशाप्रकारची पाकिटे उपलब्ध करून देण्याचा निर्धार आहे. यामध्ये प्रत्येक दिवशी बिर्याणी, पुलाव, डाळ खिचडी अशाप्रकारचे विविध प्रकारचे समावेश असेल. खासदार मनोज कोटक, भाजपचे मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा, ईशान्य मुंबई उपाध्यक्ष के. राजकुमार नाडार, वॉर्ड क्रमांक १०४चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते आदींच्या सहकार्याने संपूर्ण मुलुंडमधील गरीब आणि गरजू तसेच निराधार लोकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम पुढील १४ एप्रिलपर्यंत दररोज राबवण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

पोलिसांसह काही गरजू लोकांसाठी जेवणाची व्यवस्था

गंगाधरे यांच्याप्रमाणे भांडुपमधील भाजपच्या नगरसेविका सारिका मंगेश पवार यांनी दररोज ५०० गरजू लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. या भांडुप परिसरातील नागरिकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. अशा गरजू लोकांना घरपोच जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे सारिका पवार यांनी स्पष्ट केले. भाजपचे जोगेश्वरी येथील नगरसेवक पंकज यादव यांनी विभागातील पोलिसांसह काही गरजू लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. तर शीव-माटुंगा येथील भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर आणि दक्षिण मध्य मुंबईचे भाजपचे जिल्हाधिकारी यांनी शीव-माटुंगा परिसरातील गरीब आणि गरजू कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. तर दिंडोशीचे शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनीही आपल्या दिडोंशी मतदार संघात अनेक गरीब कुटुंबांमध्ये जेवण पुरवण्यास सुरुवात केली आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांना सध्या मनसेच्यावतीने जेवणाचे वाटप

मनसेचे उपाध्यक्ष अरविंद गावडे यांनी दक्षिण मुंबईतील सर्व रुग्णालयांमधील रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेत कार्यकर्ते यांना कामाला लावले आहे. टाटा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना सध्या मनसेच्यावतीने जेवणाचे वाटप होत असून इतर रुग्णांची नातेवाईकांची माहिती मिळवून त्यांनाही अशाप्रकारे जेवण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे अरविंद गावडे यांनी सांगितले.

- Advertisement -

भायखळा विधानसभेतील सर्व गरीब, गरजुसह रस्त्यांवर राहणाऱ्या निराधार लोकांना दुपार तसेच रात्रीच्या जेवणाची व्यवस्था शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेली आहे. तर जे.जे. रुग्णालयातील डॉक्टर्स,नर्सेस तसेच पॅरॉमेडिकल स्टाफ आणि कामगारांसाठी दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था नगरसेविका सोनम जामसुतकर व माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी केली आहे.


हेही वाचा – CoronaVirus: १४ दिवसांमध्ये साडेपाच हजार ठिकाणी केली जंतुनाशक फवारणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -