घरमुंबईचिमुकलीचा वाढदिवस साजरा करताना अचानक आगीने घेतला पेट

चिमुकलीचा वाढदिवस साजरा करताना अचानक आगीने घेतला पेट

Subscribe

लहान मुलीचा वाढदिवस साजरा करत असताना घरात अचानक आग लागल्याने त्या आगीत घरातील सर्व सामान जळून राख झाल्याची घटना कोपरखैरणे परिसरात घडली.

लहान मुलीचा वाढदिवस साजरा करत असताना घरात अचानक आग लागल्याने त्या आगीत घरातील सर्व सामान जळून राख झाल्याची घटना रविवारी सायंकाळी कोपरखैरणे परिसरात घडली. यावेळी त्वरीत अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची नोंद कोपरखैरणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

घरातील समाना जळून खाक 

कोपरखैरणे सेक्टर १९ मधील प्लॉट २०२, मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नीलम बानव खान यांच्या मुलीचा रविवार, ३० जून रोजी वाढदिवस होता. सायंकाळी सहाच्या सुमारास वाढदिवस साजरा होत असल्याने घरात कामाची लगबग होती. एकीकडे वाढदिवसानिमित्त जेवण बनवण्याची तयारी सुरु होती, तर दुसरीकडे वाढदिवसाची. यात गॅस गळतीकडे कोणाचेही लक्ष नसल्याने वाढदिवसाला सुरुवात करण्यात आली. त्याचवेळी आगीने पेट घेतला आणि एकच पळापळ झाली. सर्वांनी घराबाहेर धाव घेतली. बघता बघता सर्व घरातील सामान जळून खाक झाले. त्याचवेळी अग्निशमन दलाने आग विझवण्यास सुरुवात केली. काही वेळाने आग आटोक्यात आली. मात्र घरातील सर्व सामान जळून राख झाले. या प्रकरणाची नोंद कोपरखैरणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

‘बॅटमॅन’ आमदाराला जामीन; भाजप कार्यकर्त्यांचा गोळीबार करत जल्लोष

कोंढवा इमारत दुर्घटना प्रकरण; विपुल आणि विवेक अग्रवालला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -