घरCORONA UPDATEभयंकर! Quarantine रूग्णांच्या चहाच्या कपात आढळले गांडूळ

भयंकर! Quarantine रूग्णांच्या चहाच्या कपात आढळले गांडूळ

Subscribe

कल्याण – डोंबिवली महानगरपालिका (kdmc) क्षेत्रातून करोणा रूग्णावर विलगीकरण आणि उपचारार्थ क्वारंटाईन (Quarantine) केले जात असून भिवंडी बायपासजवळील टाटा आमंत्रा या ठिकाणी मोहने येथे राहत असणाऱ्या एका रूग्णाच्या चहामध्ये चक्क गांडूळ (Earthworms) आढळून आले. हा प्रकार रूग्णाच्या निदर्शनास आल्याने त्याला उलटीच्या त्रासाने ग्रासले. याबाबत या रूग्णाने तेथील पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांना झालेला धक्कादायक प्रकार दाखवला असून याची कुठेही वाच्यता न करण्याची त्याला समज दिली.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून क्वारंटाईन आणि कोरोना पॉझिटिव रूग्णांवर टाटा आमंत्रा येथे उपचारार्थ कल्याण-डोंबिवली महानगरपालिका दाखल करत आहे. अनेकदा उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांकडून जेवणासंदर्भात वाढत्या तक्रारी येत असून निकृष्ट दर्जाचे अन्न देत असल्याचा आरोप यापूर्वी केला गेला आहे. मोहने येथील संशयित रूग्ण असणाऱ्या तीस वर्षीय तरुणाला ९ जुलै रोजी विलगीकरण कक्षात उपचारार्थ ठेवले गेले. कोरोना संदर्भात त्याची टेस्ट अकरा तारखेला घेण्यात आली होती. सहा ते सात दिवसाचा कालावधी उलटूनही त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. आज सकाळी त्याला देण्यात आलेल्या चहामध्ये गांडूळ असल्याचे त्याच्या लक्षात आले. यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात उलट्यांचा त्रास होऊ लागला.

या संदर्भात त्याने कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितला असून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील चहाच्या कपात गांडूळ असल्याचे निदर्शनास आणून दिल्याचे त्याने “आपलं महानगर” शी बोलताना सांगितले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची कुठेही वाच्यता करू नको, चुकून झाले असल्याचे त्यांनी या रुग्णाला सांगितले. यासंदर्भात टाटा आमंत्रा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शोभा साबळे विचारणा केली असता गांडूळ मिळाल्याचा यांनी दुजोरा दिला आहे. मात्र टाटा आमंत्राचे नाव कोणी तरी जाणीवपूर्वक बदनाम करत असून दोन दिवसापूर्वी नवा कॅट्रेस पालिकेने दिला असल्याचेही डॉ. साबळे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा –

गणेशमूर्ती ऐवजी धातूच्या मूर्तीचे पूजन करावे, सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -