घरअर्थजगतEgg Price: 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' म्हणण्याआधी जरा थांबा;...

Egg Price: ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ म्हणण्याआधी जरा थांबा; मुंबईत ‘या’ कारणाने अंडी महागली

Subscribe

गाव खेड्यापासून ते अगदी महानगरीय शहरापर्यंत सगळ्यांना जेवणात आवडतात ती अंडी. अशातच आरोग्याची काळजी घेणारे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात अंडी खायाला पसंती देतात. यामुळे आता थंडीत अंड्याची मागणी वाढली असून, दर दिवशी अंड्याच्या दरांमध्ये वाढ होत आहे.

मुंबई : अर्थशास्त्रीय नियमानुसार, एखाद्या वस्तुची मागणी वाढली की किंमत वाढते तर मागणी घटली की किंमत घटते. अगदी हाच नियम सध्या मुंबईत तंतोतंत लागू पडत आहे. कारण, थंडीची चाहूल लागताच अंड्यांच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून, डझनभर अंड्यांसाठी मुंबईत तब्बल 94 ते 96 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे गाणे म्हणण्याआधी अंड्याच्या वाढत्या भावावर लक्ष देण्याची गरज आहे. (Egg Price Wait a minute before you say Sunday ho ya mande roj khao egg Eggs became expensive in Mumbai due to this reason)

गाव खेड्यापासून ते अगदी महानगरीय शहरापर्यंत सगळ्यांना जेवणात आवडतात ती अंडी. अशातच आरोग्याची काळजी घेणारे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात अंडी खायाला पसंती देतात. यामुळे आता थंडीत अंड्याची मागणी वाढली असून, दर दिवशी अंड्याच्या दरांमध्ये वाढ होत आहे. अंड्याचे दर हे मुंबईतील विविध भागात वेगवेगळे आहेत. असे जरी असले तरी मागील आठवड्यात डझनभर अंड्यांचा दर 80 ते 84 रुपये इतका होता. मात्र, मागणी वाढल्याने आता या आठवड्यात डझनभर अंड्यांचा दरात थेट 6 ते 10 रुपये एवढी वाढ झाली आहे. आता ग्राहकांना 90 रुपये देऊन एक डझन अंडी खरेदी करावी लागत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Winter Session : लोकसभेत दोन तरुणांची घुसखोरी; उपसभापतींनी विधान परिषदेतील गॅलरी पास केले बंद

असे वाढत गेले अंड्याचे दर

अंड्यांच्या खरेदीचा डझनासाठीचा घाऊक दर हा 78 रुपये इतका आहे. मात्र, दुकानदार सर्व खर्च धरुन एका अंडं 6 ते 10 रुपयांना विकत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी शंभर अंड्यांचा दर 620 रुपये एवढा होता. नोव्हेंबर महिन्यात 100 अंड्यांचा दर 580 तर ऑक्टोबरमध्ये 560 आणि ऑगस्ट महिन्यात 480 रुपये इतका होता. तर सध्या किरकोळ विक्रेत्यांकडून एक डझन अंड्यांसाठी 84 ते 90 रुपये इतका दर आकारला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Winter Session : लोकसभेतील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही; विरोधकांकडून राजकारण तर, सरकार म्हणते…

या कारणामुळे अंड्यांची आवक घटली

हैदराबाद हे अंडी उत्पादनाचे हब मानले जाते. देशभरात हैदराबादमधूनच अंडी पुरविल्या जातात. मुंबईकरही हैदराबादच्या अंड्यावर अवलंबून असतात. मात्र, यंदा हैदराबादमध्ये अंड्यांचे उत्पादन घटले आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये अंड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे ज्या प्रदेशातून अधिक अंड्यांची मागणी होतेय तेथे पुरवठा केल्या जात आहे. तर मुंबई मागणी करण्यास थोडा उशीर करत असल्याने मुंबईत अंड्यांची आवक घटली आहे. यामुळे मुंबई आहे त्या अंड्याचे दर वाढविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -