घरमुंबईमुंबईत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक

मुंबईत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक

Subscribe

मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली.

मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. विविध सहा ठिकाणी स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बांगलादेशातील गरिबीसह उपासमारीला कंटाळून ते सर्वजण बांगलादेशातून मुंबईत पळून आल्याचे तपासात उघडकीस आहे आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या नऊ जणांना बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे. ( Eight Bangladeshi nationals illegally residing in Mumbai arrested by mumbai police  )

मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्यास आहेत. अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. ही मोहीम सुरु असतानाच बोरिवली येथून मोहम्मद मोहीउद्दीन, बाबू मलिक, अब्दुल मलिक या दोघांना कस्तुरबा मार्ग, दादर येथून जनाबअली अतियारवन गाझी, इसाक असिरुद्दीन मंडोल, मोहम्मद इक्बाल नजीर खान ऊर्फ राजू अनिल दास या तिघांना भोईवाडा आणि दादर पोलिसांनी तर गोरेगाव येथून मेहबू जाफर शेख, एंटॉप हिल येथून सुलेमान गयासुद्दीन शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

हे सर्व बांगलादेशी तरुण मुंबईत मिळेल ते काम करत होते. मुंबईसह ठाणे ग्रामीण परिसरात ते सर्वजण वास्तव्यास होते आणि मुंबईत कामाचा शोध घेण्यासाठी येत होते. यातील मोहम्मद खान हा मुंबईत राजू दास या नावाने राहत होता. तो दादर येथे मासे विक्रीचे काम करत होता. गेल्या १९ वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी आठ मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले असून ते याच मोबाईलमधून त्यांच्या बांगलादेशातील कुटुंबियांसोबत नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

( हेही वाचा: छत्रपती संभाजीनगर राड्याप्रकरणी जलील यांचं थेट पंतप्रधानांना पत्र; केले हे गंभीर आरोप )

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -