घरमुंबईभायखळा, धारावीत ६३ लाखांची संशयास्पद रक्कम जप्त

भायखळा, धारावीत ६३ लाखांची संशयास्पद रक्कम जप्त

Subscribe

विधानसभा निवडणुकीतील प्रचारांनी सुरुवात झाली आहे. या काळात पैशांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने तपासणी पथके तैनात केली आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निवडणुक आयोगाने गैरव्यवहार रोखण्यासाठी तपासणी पथके तैनात केली आहेत. त्यानुसार तपासणी पथकाने भायखळा आणि धारावीत कारवाई करत ६३ लाख ९ हजार ७५५ रुपये एवढी संशयास्पद रक्कम पकडली आहे. सलग दोन दिवसाच्या तपासणीत ही कारवाई करण्यात आली.

भायखळ्यात ५८ लाखाची रक्कम जप्त

भायखळा विधानसभा मतदारसंघात के.के.टॉवरच्या समोर, के.के.रोड, भायखळा (पश्चिम) येथे काल सायंकाळी मोटार क्र. MH.-46, BF-9849 पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहनाची निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाद्वारे तपासणी केली असता ५८ लाख ५८ हजार १५ रुपये इतकी संशयीत रक्कम आढळून आली. ही रक्कम आग्रीपाडा पोलीस स्टेशन येथे जमा केली असून आयकर विभाग कार्यालय मुंबईचे अतिरिक्त संचालक यांना ईमेलद्वारे कळविण्यात आले आहे. अशी माहिती १८४ – भायखळा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी दिली आहे.

- Advertisement -

धारावीत ४ लाखांची रक्कम जप्त

धारावी विधानसभा मतदारसंघात ४ लाख ५१ हजार ७४० रुपये  इतकी संशयीत रक्कम पकडल आज सायन जंक्शन कडून एलबीएस रोडने कुर्ल्याच्या दिशेने जाणारे वाहन क्र. MH-001, BK-1961 या होंडा सिटी कार या वाहनाची तपासणी केला असता वाहनामध्ये ही रक्कम आढळून आली, अशी माहिती १७८-धारावी (अ.जा.) विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -