Raj Kundra च्या अडचणीत वाढ; ED कारवाईनंतर पुन्हा अटक होण्याची शक्यता

enforcement directorate case registered against raj kundra
Raj Kundra च्या अडचणीत वाढ; ED कारवाईनंतर पुन्हा अटक होण्याची शक्यता

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पॉर्न रॅकेट प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये अटक केली मात्र त्याला जामीन मंजुर झाला. ईडीने राज कुंद्राविरोधात (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

राज कुंद्राने फेब्रुवारी 2019 मध्ये आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली तसेच हॉटशॉट्स नावाचे अॅपही विकसित केले, युकेस्थित कॅनरीत कंपनीचे सीईओ प्रदीप बक्षी हे राज कुंद्राचे मेहुणे आहे. मात्र या हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीसाठी राज कुंद्राच्या विहान कंपनीने केनरिन कंपनीशी करार केला होता. यावेळी देखभालीसाठी विहान कंपनीच्या 13 बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचे व्यवहार झाले.

हॉटशॉट्स अॅप हे पॉर्न फिल्म्स प्लॅटफॉर्म होतं. ज्यामध्ये भारतात तयार होणाऱ्या पॉर्न फिल्म्स अपलोड केल्या जायच्या तसेच सबस्क्रिप्शन विकल्या जायच्या. सब्सक्राइबरच्या माध्यमातून मिळणारी मोठी रक्कम राज कुंद्राच्या विहान कंपनी मेटेंनन्सच्या नावावर केली जायची. यापद्धतीने यूकेमधून फिरणाऱ्या पॉर्न फिल्म्समधून मिळणारा पैसा मेंटेनन्सच्या नावावर राज कुंद्राच्या कंपनीच्या अकाऊंटमध्ये जायचा.

दरम्यान सुत्रांच्या माहितीनुसार, राज कुंद्रा आणि त्याच्या विहान कंपनी यांच्याशी संबंधित सर्व बँक अकाऊंटमध्ये पॉर्न चित्रपटांतून कमाईचे मोठे व्यवहार झाले आहेत. तसेच मेंटेनन्सच्या नावाखाली राज कुंद्राच्या विहान कंपनीच्या ब्रिटनमधील केनरीन कंपनीच्या 13 बाईक अकाऊंटमध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाला. यानंतर ही रक्कम काही विक्री कंपन्यांकडे वर्ग करण्यात आली आणि शेवटी ही रक्कम राज कुंद्राच्या वैयक्तिक अकाऊंटमध्ये येत असल्याची माहिती आहे.


लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेल्या टेडी बेअरचा झाला स्फोट; पुढे काय झालं वाचा