घरमुंबईकल्याणमध्ये मतदान यंत्रणेत बिघाड; मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी

कल्याणमध्ये मतदान यंत्रणेत बिघाड; मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी

Subscribe

कल्याण पूर्वेतील जरीमरी शाळा येथील १० मशीन बंद होत्या. एक तासाने त्या सुरू झाल्या. दरम्यान अनेक मतदार कंटाळून निघून गेले. डोंबिवली टिळकनगर शाळेतील मतदान यंत्र बंद होते. कचोरे कृष्ठ रुग्ण वसाहतमधील मशीन एक तास उशिरा सुरू झाले. उल्हासनगर गंगाराम शाळा मशीन बंद होते. चेतना हायस्कुल मशीन बंद होते. कल्याण ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी मशीन बंदचा फटका बसला. मतदानाची वेळ वाढविण्याची मागणी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली आहे.


कल्याण पूर्वेतील जरीमरी शाळेतील मतदान यंत्र तांत्रिक बिघाडामुळे उशिरा सुरू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुमारे ४० मिनिटं मतदान प्रक्रिया उशिराने सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून देण्याची माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मागणी केली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवलीच्या खिडकाळी गावात मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे समजते.

  • डोंबिवली – पार्थली भागातील आचार्य भिसे गुरुजी शाळेतील १३५ बुथ मधील मतदानाला अद्याप सुरुवात झालेली नाही. मशीनमध्ये बिघाड असल्याने मतदानाला विलंब
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -