घरअर्थजगतआर्थिक स्तरावर १ मेपासून 'हे' होणार महत्त्वपूर्ण बदल

आर्थिक स्तरावर १ मेपासून ‘हे’ होणार महत्त्वपूर्ण बदल

Subscribe

नवीन आर्थिक वर्ष २०१९-२० सुरू झाला आहे. या वर्षीच्या १ मे पासून काही नवीन नियम लागू केले जाणार आहेत. तर कश्यात बदल केले जाणार आहेत हे जाणून घ्या.

नवीन आर्थिक वर्ष २०१९-२० सुरू झाला आहे. जवळपास १ महिना पूर्ण झाला आहे. एप्रिल महिन्यामध्ये अनेक नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. तर काही नवीन नियम १ मे महिन्यापासून लागू करण्यात येणार आहेत. विशेष करून बँगिंक, हवाई, मोबाईल, घरघुती सिलेंटर आणि रेल्वेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी नियमांमध्ये बदल होत आहेत. या सर्व बदलांचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. पण या बदलां संबंधीत माहिती नसेल तर मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे. तर जाणून घ्या कश्यात होणार बदल.

रेल्वे प्रवाशांसाठी होणार बदल

एक मे पासून रेल्वेचा चार्ट लागण्याच्या ४ तास आगोदर प्रवाशांना आपल्याला बोर्डींग स्टेशन बदलता येणार आहे. सध्या आरक्षित तिकिटांचे बोर्डींग स्टेशन बदलता येत नव्हत. २४ तास आधी बोर्डींग स्टेशन बदलता येत होत. मात्र, १ मे नंतर यासंबंधीत नवीन नियम लागू होणार आहे.

- Advertisement -

घरघुती सिलेंटर दरामध्ये वाढ

एक मे नंतर घरघुती सिलेंडरमधील नवीन नियन लागू होणार आहेत. याआधी १ एप्रिला घरघुती सिलेंडरमध्ये वाढ करण्यात आली होती. तशीच १ मे पासून सिलेंडरच्या दरात वाढ होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे होणारे बदल

एक मे पासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठेवी आणि कर्ज व्याज दर आरबीआयच्या बेंचमार्क दराशी जोडली जाणार आहेत. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात होणाऱ्या बदलांसह मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजदरातही तातडीने बदल होणार आहे. ज्यांच्या खात्यामध्ये एक लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास त्यानाच या नियमाचा फायदा होणार आहे.

- Advertisement -

एअर इंडिया सुविधांमध्ये होणार बदल

विमानांने नेहमी प्रवास करणाऱ्यांसाठी एअर इंडियाकडून चांगली बातमी आहे. प्रवाशांना आपल्या आरक्षित तिकीट २४ तासांच्या आत रद्द करता येणार आहेत. तसेच प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारणात येणार नसल्याची घोषणा केली आहे.

मोबाईल युजरसाठी होणार आहेत हे बदल

मोबाईल युजर्सना सिमकार्ड खरेदी करायचे असल्यास त्यांना आपले आधारकार्ड दाखवावे लागत होते. मात्र, १ मे नंतर आधारकार्डशिवाय सिम खरेदी करू शकणार आहेत. नवीन सिमकार्ड घेण्यासाठी विनाआधारवाली डिजिटल केवाईसी सिस्टम तयार करण्यात आली आहे. तसेच सिमकार्ड खरेदी करणाऱ्यांना वेरिफिकेशन करून १ ते २ तासांमध्ये सक्रिय करून दिले जाणार आहेत.


हेही वाचा-

Loksabha election Live Update: देशभरात ५ वाजेपर्यंत ५०.६ टक्के मतदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -