घरताज्या घडामोडीमहाकाली गुंफा घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी - किरीट सोमय्या

महाकाली गुंफा घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी – किरीट सोमय्या

Subscribe

महाकाली गुंफा मंदिर आणि परिसरात विकास प्रकल्पासाठीचा झालेल्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. माजी मंत्री रवींद्र वायकर यांना महाकाली गुफा प्रकल्पात तब्बल २५ कोटी रूपये मिळाले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळेच या सगळ्या व्यवहाराची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी सोमय्या यांनी केली. हे प्रकरण घेऊन येत्या आठवड्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संपुर्ण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रवींद्र वायकर यांना पाठिंबा असल्याचाही दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बिझनेस पार्टनर असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

काय आहे महाकाली गुंफा घोटाळा ?
महाकाली मंदिर गुंफा परिसर आणि परिसराचा विकासासाठी मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकार यांनी एकत्रितपणे शाहीद बलवा आणि अविनाश भोसले यांना या प्रकलाचे काम दिले. या विकास प्रकल्पासाठी २०० कोटी रूपयांचा व्यवहार झाला. त्यापैकी २५ कोटींचा मोबदला हा रवींद्र वायकर यांना थेट देण्यात आला. जवळपास १ लाख चौरस फूट जागा अवघ्या ३ लाख रूपयांमध्ये शाहीद बलवा आणि अविनाश भोसले यांना देण्यात आली. त्यामध्ये झालेला नफा हा रवींद्र वायकर यांना मिळाला. या संपुर्ण व्यवहारासाठी मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री कार्यालय यांनी पुर्ण पाठिंबा या व्यवहारात दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाकाली जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी ही रवींद्र वायकर यांना सुपूर्द करण्यात आली आहे. म्हणूनच या संपुर्ण महाकाली घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संपुर्ण प्रकरणात राज्यपालांना भेटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपुर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे. म्हणूनच या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -