घरमुंबईजनशताब्दीला आता सावंतवाडीत मिळणार थांबा!

जनशताब्दीला आता सावंतवाडीत मिळणार थांबा!

Subscribe

३० ऑगस्टपासून जनशताब्दीला ६ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सावंतवाडीत मिळणार दोन मिनिटांचा थांबा

कोकणात गणेशोत्सवाच्या निमित्ताने जाणाऱ्या अनेक प्रवाशांसह चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कारण, मुंबईकडून गोव्याला जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा मिळणार असल्याने बाप्पा पावला असेच म्हणावे लागणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसला सावंतवाडी स्थानकात थांबवले जाणार असून हा निर्णय कोकण रेल्वे मंडळाकडून घेण्यात आला आहे.

सुपरफास्ट एक्स्प्रेसना सावंतवाडी स्थानकावर थांबा

कोकणात गणेश चतुर्थीचे खूप महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने लोक कोकणातील अनेक भागात प्रवास करत असतात. म्हणून गेल्या काही महिन्यांपासून मंगला, नेत्रावती यांसारख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसना सावंतवाडी स्थानकावर थांबा मिळावा, याकरिता काही प्रवासी संघटना देखील प्रयत्नशील होत्या आणि अखेर जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा मिळाला आहे.

- Advertisement -

प्रायोगिक तत्त्वावर दोन मिनिटांचा थांबा देण्याचा निर्णय

गणेशोत्सवाच्या तसेच काही सणांच्या पार्श्वभूमीवर ३० ऑगस्टपासून दादर-मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसला ६ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सावंतवाडी स्थानकात दोन मिनिटांचा थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -