घरCORONA UPDATECoronaEffect: आता ई-वे बिलासाठीही ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

CoronaEffect: आता ई-वे बिलासाठीही ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Subscribe

मालाची वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांना शासनाने दिलासा देत ई-वे बिलासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालाची वाहतूक करताना माल वाहतूकदाराला जवळ बाळगाव्या लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वे बिल अर्थात ई-वे बिलच्या तारखेसही लॉकडाऊनमुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंसह इतर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाने २० मार्चला काढलेल्या आणि १५ एप्रिलला मुदत संपणाऱ्या ई-वे बिलाला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Coronavirus : कस्तुरबा रुग्णालयाने नाकारलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह!

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, यासाठी केंद्र शासनाने अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्त्यावर धावण्यास परवानगी दिली आहे. इतकेच नव्हेतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालाची वाहतूक करताना माल वाहतूकदाराला वाहनांच्या ई-वे बिलाची मुदत वाढवून दिली आहे. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही सामानाची वाहतूक करताना ई-वे बिल बंधनकारक आहे. मात्र लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेल्या माल वाहतूक वाहनांच्या ई-वे बिलाची मुदत संपण्याची भीती माल वाहतूकदारांना सतावत होती. ई-वे बिलाची मुदत संपल्यानंतर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर शासनाकडून जबर दंड आकारला जातो. त्यामुळे माल वाहतुकदारांकडून मुदतवाढीची मागणी पुढे आली होती. अखेर शासनाने हिरवा कंदील दाखवत २० मार्चला काढलेल्या आणि १५ एप्रिलला मुदत संपणाऱ्या ई-वे बिलाला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -