घरताज्या घडामोडीखंडणी आणि जमीन बळकावल्या प्रकरणी परमबीर सिंह यांच्या ५ निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची...

खंडणी आणि जमीन बळकावल्या प्रकरणी परमबीर सिंह यांच्या ५ निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी

Subscribe

मरीन ड्राईव्ह येथे खंडणी आणि जमीन बळकावल्या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या ५ निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांचे उचलबांगडी करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात आली आहे. यामध्ये २ पोलीस उपायुक्त, २ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि १ महिला पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे. या सर्वांची नायगाव सशस्त्र विभाग या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

यांची करण्यात आली बदली?

पोलीस उपायुक्त – अकबर पठाण
पोलीस उपायुक्त – पराग मणेरे
सहाय्यक पोलीस आयुक्त – संजय पाटील
सहाय्यक पोलीस आयुक्त – सिद्धार्थ शिंदे
महिला पोलीस निरीक्षक – आशा कोरके

- Advertisement -

मुंबई गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्याकडील पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रकाश जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त पराग मणेरे यांची बदली करण्यात आली असून त्याचा पदभार डीसीपी श्रीकांत परोपकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि सिद्धार्थ शिंदे यांच्याकडील कार्यभाराबाबत मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस सह आयुक्तांनी निर्णय घ्यावा आणि महिला पोलीस निरीक्षक आशा कोरके यांच्याकडील कार्यभाराबाबत अपर पोलीस, आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग यांनी अंतर्गत पर्यायी व्यवस्था करावी, असा आदेश देण्यात आला आहे.

यापूर्वी शरद अग्रवाल या व्यक्तीने कोपरी पोलीस ठाण्यातील तक्रारीवरून परमबीर सिंह, पराग मणेरे, संजय पूनामिया, सुनील जैन आणि मनोज घोटकर विविध कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद अग्रवालने सांगितले की, ‘त्याला आणि त्याच्या भावाला खोट्या केसमध्ये अडकवण्यात येणार होते. पण असे करू नये म्हणून त्याच्याकडून २०१६ ते २०१८ या कालावधीत २ कोटी रुपये वसूल करण्यात आले. तसेच आईच्या नावावरील भाईंदर येथील ८ कोटींची जमीन फक्त १ कोटी रुपयांमध्ये खंडणीद्वारे घेतली. एवढेच नाही तर शरद अग्रवाल या व्यक्तीचे काका श्याम सुंदर अग्रवाल यांच्यावर मोक्का केस टाकण्याची धमकी देऊन २ कोटी ६९ लाख रुपये चेकच्या माध्यमातून वसूल केले. काकांच्या नावावरील जमीन खंडणीद्वारे स्वतःच्या नावावर करून घेतली. अशी एकूण ४ कोटी ६८ लाख रुपये आणि २ जमीन परमबीर सिंह यांच्यासह संजय पूनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांनी खंडणी म्हणून वसूल केल्या.’

- Advertisement -

 


हेही वाचा – मुंबईतील अंधेरी भागात ४ मजली इमारत कोसळली; ५ जण जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -