घरमुंबईनिकाल मिळण्याकरिता अपंग विद्यार्थ्यांचे उपोषण

निकाल मिळण्याकरिता अपंग विद्यार्थ्यांचे उपोषण

Subscribe

अपंग विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2016 चे निकाल अद्यापही न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे. 29 जानेवारीपासून या विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मात्र प्रशासनाने अद्यापही त्यांच्याकडे लक्ष दिले नसल्याने या विद्यार्थी वर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे. डोंबिवली येथील तोंडवळकट कनिष्ठ महाविद्यालयात मार्च 2016 मध्ये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी 22 विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा झाल्यानंतर या अपंग मूकबधिर विद्यार्थ्यांचा निकाल तोंडी सांगण्यात आला. वारंवार पत्रव्यवहार करुनही आजपर्यंत या विद्यार्थ्यांना निकाल मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. हा विषय निकाली काढण्यात यावा यामुळे शिक्षण मंडळाकडे विचारणा आणि पत्रव्यवहार केला असता शिक्षण मंडळाकडून थातूरमातूर उत्तरे देऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात आहे.

सदर विद्यार्थी शिक्षण मंडळाने दिलेल्या इंग्लिश विषय घेऊन उत्तीर्ण सुद्धा झाले आहेत. त्या इंग्रजी विषयाचा निकाल देखील अद्याप देण्यात आलेला नाही. अखेर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली हे विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र शिक्षण मंडळ स्वत:च्या चुकांवर पांघरुन घालून या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आजतागायत 3 वर्षे पद्धतशीरपणे खेळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या 12 वी 2016 चा निकाल तत्काळ मिळावा अन्यथा काहीही दुर्घटना घडल्यास सर्व जबाबदारी शिक्षण मंडळाची राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -