घरताज्या घडामोडीCorona Vaccination: नागरिकांमधील लसीबाबतची भीती जाऊन उत्सुकता वाढली - आदित्य ठाकरे

Corona Vaccination: नागरिकांमधील लसीबाबतची भीती जाऊन उत्सुकता वाढली – आदित्य ठाकरे

Subscribe

नागरिकांमध्ये कोरोनावरील लसीबाबतची प्रारंभी निर्माण झालेली भीती गेली आहे. आता नागरिकांमध्ये लसीबाबत एक प्रकारची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी पालिकेच्या ट्विटरद्वारे लसीकरण केंद्रांवर लसीची उपलब्धता पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

शिवसेना नगरसेविका सान्वी तांडेल यांच्या पुढाकाराने चुनाभट्टी येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे प्रसुतिगृहात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे उदघाटन पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले.

- Advertisement -

याप्रसंगी, महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस, आमदार मंगेश कुडाळकर, माजी नगरसेवक विजय तांडेल, एल विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज आणि संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. लसीकरण केंद्रावर आल्यानंतरसुद्धा नागरिकांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क हा ठेवलाच पाहिजे. मुंबईत प्रत्येक वार्डात लसीकरण केंद्र सुरू झाली पाहिजे. तसेच, लसीकरण केंद्रासाठी नगरसेवकांमध्ये हेल्दी स्पर्धा असली तरी चालेल. जेणेकरून जास्तीत जास्त लसीकरण केंद्र तयार होतील, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासात ४ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, ७१ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -