घरCORONA UPDATECorona Update : नातेवाईकांना रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णाला भेटू द्या; धनंजय पिसाळ...

Corona Update : नातेवाईकांना रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णाला भेटू द्या; धनंजय पिसाळ यांची शरद पवारांकडे मागणी

Subscribe

नातेवाईकांना रुग्णाला भेटण्याची परवानगी नसते. त्यामुळे रुग्णांमध्ये निराशा, एकटेपणा येऊ शकतो, असे धनंजय पिसाळ म्हणाले. 

कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ईशान्य जिल्हा अध्यक्ष आणि माजी गटनेते धनंजय पिसाळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर पालिका, शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मात्र, काही वेळा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांकडे दुर्लक्ष होते. रुग्णांना आपल्या नातेवाईकांची आठवण येते. मात्र, कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णाला एकटेच त्या कक्षात ठेवण्यात येते. नातेवाईकांना त्या रुग्णाला भेटण्याची परवानगी नसते. त्यामुळे रुग्णांमध्ये निराशा, एकटेपणा येऊ शकतो, असे धनंजय पिसाळ म्हणाले.

रुग्णांना नातेवाईक जवळ नसल्याने ताण येतो. काही रुग्णांचा त्यामुळे मृत्यू होतो. रुग्णालय प्रशासन नातेवाईकांना वॉर्डमध्ये आपल्या रुग्णाजवळ किंवा रुग्णालयाच्या आवारातही थांबू देत नाहीत. त्यामुळे आपल्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी त्यांना तपासले का? त्यांना उपचार वेळेत दिले जात आहेत का? ते जेवले का? असे अनेक प्रकारचे प्रश्न नातेवाईकांना सतावत असतात, असेही पिसाळ म्हणाले.

- Advertisement -

रुग्णाला बरेचदा एकाकी वाटते. त्यांना त्यावेळी जवळच्या व्यक्तीची आवश्यकता असते. त्यामुळे रुग्णाला एकप्रकारे मानसिक आधार मिळावा, बरे वाटावे यासाठी नातेवाईकांना पीपीई किट वापरून भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पिसाळ यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -