बोरिवलीतील शॉपिंग सेंटरला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बोरिवलीतील शॉपिंग सेंटरला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल

मुंबईतील बोरीवली वेस्ट येथील शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागण्याची दुर्घटना घडली आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बोरिवलीतील इंद्रप्रस्था शॉपिंग सेंटरमध्ये साखर झोपेत असताना अचानक आग लागली. काही वेळानंतर आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण शॉपिंग सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग इमारतीच्या ग्राउंड प्लोअरवर लागली आहे. या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उडाले आहेत. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अजूनही समोर आली नाही. तसेच आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीमुळे शॉपिंग सेंटरमधील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

शॉपिंग सेंटरला लागल्या आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर सकाळी ६ वाजता पहिल्यांदा ४ गाड्या त्यानंतर १३ वॉटर टँकर घटनास्थळी पोहोचले. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


हेही वाचा – धक्कादायक हॉस्पिटलमधून पळालेल्या कोरोना रूग्णाचा फुटपाथवर मृत्यू