घरमुंबईजीवघेण्या ट्यूमरपासून तरूणीची सुटका

जीवघेण्या ट्यूमरपासून तरूणीची सुटका

Subscribe

राज्य सरकारच्या ऑलब्लेस कामा हॉस्पिटलमधील डॉक्टरांना एका २४ वर्षीय तरूणीच्या पोटातून ६.५ किलोचा ट्युमर काढण्यात यश आलं आहे. या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करुन तिला जीवदान देण्यात आलं आहे.

खासगी हॉस्पिटल्समध्ये लाखो रुपयांच्या घरात होणाऱ्या शस्त्रक्रियांचा पर्याय आता सरकारी हॉस्पिटल्समध्ये ही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे, अनेक रुग्णांना त्याचा फायदा होतो आहे. राज्य सरकारच्या ऑलब्लेस कामा हॉस्पिटलमधील डॉक्टरांना एका २४ वर्षीय तरूणीच्या पोटातून ६.५ किलोचा ट्युमर काढण्यात यश आलं आहे. या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करुन तिला जीवदान देण्यात आलं आहे. स्पिंडल सेल ट्युमर प्रकारची गाठ तरुणीच्या जीवावर बेतणारी होती. शिवाय यापूर्वीही तिच्यावर ट्यूमरची शस्त्रक्रिया एका खासगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. पण, पुन्हा ट्यूमरचा त्रास या तरुणीला झाला आणि तिला कामा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले असून तिच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

कामा हॉस्पिटलमध्ये स्पिंडल सेल ट्युमरवर यशस्वी शस्त्रक्रिया

वर्षभरापासून त्या गाठीचा आकार आणि होणारा त्रास अधिक असल्याने तपासणीसाठी ती तरुणी त्रासली होती. तिच्या पोटाचा आकार हा ३६ आठवड्यांच्या गर्भवती महिलेप्रमाणे झाला होता. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर यापूर्वीही २०१६ मध्ये तिच्या गर्भाशयात गाठ झाल्याचं निदान झालं. ही गाठ पोटात सर्वत्र पसरून ३० बाय २२.५ बाय १४ सेमी एवढी झाली. या गाठीचा काही भाग हा गर्भाशयाला तसंच यकृत आतडे अशा अनेक अवयवांना चिटकला होता. त्यामुळे तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

- Advertisement -

ज्या ठिकाणी बरगड्या संपतात तिथपासून अगदी गर्भाशयापर्यंत त्या मुलीचे पोट फुगले होते. यामुळे शरीरभर रक्ताचा पुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्या प्रभावित होत होत्या. हा ट्युमर त्या रक्तवाहिन्यांवरच वाढत होता. त्यात यकृतातून रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यामुळे लवकरात लवकर ट्युमर काढणे गरजेचं होतं. त्यामुळे तिची शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया डॉ. विलास कुरूडे आणि भूलतज्ज्ञ यांच्या टीम यशस्वी केली.  – डॉ. व्यंकट गीते, युरोलॉजी विभाग प्रमुख


हेही वाचा – धक्कादायक! ब्रेन ट्यूमरने त्याची उंची सात फुटापर्यंत वाढवली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -