घरमुंबईअग्निशमन कर्मचार्‍यांनी मानले महापौरांचे आभार

अग्निशमन कर्मचार्‍यांनी मानले महापौरांचे आभार

Subscribe

नरेश म्हस्के प्रयत्नामुळे कर्मचार्‍यांना सुधारित वेतनश्रेणी लागू

अग्निशमन दलातील कर्मचार्‍यांच्या ग्रेड पेमधील त्रुटी दूर करुन त्यांना नियमानुसार असलेली ग्रेड पे लागू करण्यात आली आहे. यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी सातत्याने प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कर्मचार्‍यांना न्याय मिळाला असल्याने या सर्व कर्मचार्‍यांनी गुरुवारी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले तसेच महापौरपदी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक सुधीर कोकाटे यांचेही आभार कर्मचार्‍यांनी मानले.

ठाणे महापालिकेतील अग्निशमन दलातील कर्मचार्‍यांना नॉन क्लालिफाय ऑफिसर या पदासाठी नियमानुसार 4200 रु ग्रेड पे असताना देखील त्यांना 2400 रुपये ग्रेड पे देण्यात येत होता. यामुळे या कर्मचार्‍यांवर अन्याय होत होता. अग्निशमन विभाग हा अत्यावश्यक सेवेत येत असून या विभागातील कर्मचारी 24 तास महापालिकेला सेवा देत असतात. परंतु त्यांना नियमानुसार देय असलेली रक्कम वारंवार पाठपुरावा करुन देखील मिळत नव्हती. यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन या कर्मचार्‍यांना देय असलेली रक्कम प्रशासनाने लागू केली असून मागील चार महिन्यांपासून या वेतनश्रेणीचा लाभ कर्मचार्‍यांना मिळण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

याबद्दल सर्व कर्मचार्‍यांनी महापौरांना प्रत्यक्ष भेटून आभार व्यक्त केले. महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना नियमानुसार देय असलेली रक्कम मिळालीच पाहिजे, हे कर्मचारी सेवा देत असून अप्रत्यक्षरित्या शहराच्या विकासामध्ये हातभार लावत असतात. आपण यापुढेही ज्या कर्मचार्‍यांवर अन्याय होत असेल त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -