घरमुंबईभिंवडीत कार्पेट गोदामाला लागली भीषण आग

भिंवडीत कार्पेट गोदामाला लागली भीषण आग

Subscribe

भिवंडीतील कशेळी गावातील राजलक्ष्मी कम्पाउंड येथील कार्पेट गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

मुंबईत कालच अंधेरीत कामगार रुग्णालयाच्या आगीच्या घटनेला २४ तास ही उलटत नाही तोवर आगीची दुसरी घटना घडली आहे. भिंवडीतील एका कार्पेट गोदामाला ही आग लागली आहे. भिवंडीतील कशेळी गावातील राजलक्ष्मी कम्पाउंड येथे ही घटना घडली आहे. आग लागल्याचे निदर्शनात आल्यास लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यास अडचण आली. दरम्यान अग्नीशमन दलाला याची माहिती देण्यात आली आहे. माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. सध्या आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. या घटनेत कोणतीही जीवित हाणी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणाता वित्तहाणी झाली आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -