घरमुंबईकुलाबा परिसरातून बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनी सापडल्या

कुलाबा परिसरातून बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनी सापडल्या

Subscribe

शाळेतून सुटल्यानंतर बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनींनी मारिन लाइन्स ते हँगिंग गार्डन आणि नंतर दादर ते ठाणे आणि ठाणे ते दादर असा प्रवास केल्याचे तपासात उघड झाले आहे. कुलाबा पोलिसांनी विद्यार्थिनींना कुर्ला रेल्वे स्टेशनवरुन ताब्यात घेतले.

कुलाबा परिसरातून बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनी सापडल्या आहेत. कुलाब्याच्या फोर्ट कॉन्व्हेट स्कूलमध्ये शिकणाऱ्या पाचही विद्यार्थिनी शुक्रवार दुपारपासून बेपत्ता होत्या. या विद्यार्थिनींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पाच विद्यार्थिनिंपैकी चार विद्यार्थिनींना कुलाबा पोलिासांनी ताब्यात घेतले आहे. या विद्यार्थिनींची पोलिसांकडून चौकशी सुरु असून बेपत्ता असलेल्या एका विद्यार्थिनीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

मरीन ड्राईव्हवरुन ठाण्याला केला प्रवास

शुक्रवार दुपारपासून बेपत्ता झालेल्या या पाचही विद्यार्थीनी शाळा सुटल्यानंतर मरीन ड्राईव्ह ते ठाणे आणि ठाण्यापासून पुन्हा कुर्ला असा प्रवास केल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी त्यांच्या परीक्षेचा निकाल लागला. परिक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून त्या शाळेतून घरी परत न येता मरीन ड्राइव्हला गेल्या. तिथून पुन्हा हँगिंग गार्डन आणि नंतर ठाणे असा प्रवास त्यांनी केला आहे. आज दुपारी त्यांना कुर्ला रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र यामधील एक विद्यार्थिनी अजूनही बेपत्ता आहे. तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

- Advertisement -

कुर्ला रेल्वे स्टेशनवरुन घेतले ताब्यात

शाळेतून मुली घरी न आल्यामुळे चिंतेत आलेल्या पालकांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी मुंबईतल्या सगळ्या पोलीस ठाण्यात या मुलीचे फोटो व्हायरल केले होते. या मुली सापडल्यास कुलाबा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांच्या पथकांनी शोध घेतला असता आज कुर्ला रेल्वे स्थानकावरून त्यांना ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -