घरफिचर्सवाचा श्रीकृष्ण जन्माची कहाणी..!

वाचा श्रीकृष्ण जन्माची कहाणी..!

Subscribe

श्रीकृष्ण जन्माचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मध्यरात्री जन्मोत्सवाचा सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळतो.

कृष्णा, कान्हा, गोपाळ, नंदलाला अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुरलीधराचा जन्माष्टमीचा सोहळा रविवार, २ सप्टेंबरच्या मध्यरात्री आपण साजरा करणार आहोत. नेमकी काय आहे, श्रीकृष्ण जन्माची कहाणी हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. आपल्या देशात कित्येक वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला जातो. तिथीनुसार श्रीकृष्णाचा जन्म हा श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना झाला होता. त्यामुळे रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी कृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला जातो. गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात. त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

दहीकाल्याचे महत्त्व

विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळं एकत्र कालवून केलेला पदार्थ म्हणजे `काला’. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चरायला घेऊन जाताना स्वत:ची आणि सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला. सर्वांसह तो खाल्ला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची तसेच दहीहंडी फोडण्याची सुरू झाली.

- Advertisement -

काल्यातील प्रमुख घटक आणि त्याचे अध्यात्मिक महत्त्व

पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्‍तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्‍या मातृभक्‍तीचे प्रतीक
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्‍तीचे प्रतीक
ताक : गोपींच्या विरोधभक्‍तीचे प्रतीक
लोणी : या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.

दहीहंडीचा उत्सव जल्लोषात 

दहीहंडीचा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांसोबत केलेल्या असंख्य लीलांपैकी एक म्हणजे गोपिकांच्या हंड्या फोडून त्यातून लोणा चोरून खाण्याचे कृत्य हे एक आहे. त्याचेच प्रतीक म्हणून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी हंडीमध्ये दही, दूध, फळं ठेवली जातात. आजच्या युगातील गोविंदा ही हंडी फोडून मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करतात. आता तरी गोपीकाही या उत्सवात सहभाही होऊन उंचच्या उंच बांधलेल्या हंड्या फोडू लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -