घरमुंबईविक्रोळीत स्लॅब कोसळून पाच जण जखमी

विक्रोळीत स्लॅब कोसळून पाच जण जखमी

Subscribe

विक्रोळी येथे इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच कामगार जखमी झाले आहेत.

विक्रोळी मधील कन्नमवारनगर येथील इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. या झालेल्या अपघातात सात कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. या कामगारांना रुग्णालयात दाखल केले असून यापैकी दोन कामगारांने सुश्रुषा रुग्णालयामध्ये तर इतर तिघांना टागोर नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

अशी घडली घटना

विक्रोळी मधील कन्नमवारनगर २ येथील उत्कृर्ष बाल शाळेसमोर सांस्कृतिक कला भवन आहे. हे कलाभवन २००८ ते २००९ मध्ये बांधण्यात आले होते. या भवनाचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम सुरु असताना अचानक रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक स्लॅब कोसळ्याची घटना घडली. या अपघातात ढिगाऱ्याखाली पाच कामगार अडकले होते. या घटनची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करण्यास सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच कामगारांना बाहेर काढण्यात जवानांना यश आले. मात्र हे कामगार किरकोळ जखमी झाले आहे. यातील अमिरुन हसन याच्या डोक्याला जखम झाली असून, अशोक तुकाराम घोडे यांच्या कपाळावर मार लागला आहे. तर मोहम्मद जलाउद्दीन, टोनी शेख आणि अनारुल हक्क हेही किरकोळ जखमी झाले आहेत. या पाच कामगारांपैकी दोन कामगारांवर उपचार करण्यासाठी त्यांना सुश्रुषा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर इतर तिघांना टागोर नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या पाचही कामगारांवर अधिक उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

संबंधित बातम्या –

वाचा – विलेपार्ले येथे विहिरीचा स्लॅब कोसळून तीघांचा मृत्यू

वाचा – दहिसरमधील रेल्वे वसाहतीत स्लॅब कोसळला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -