घरताज्या घडामोडीखाद्य तेल उत्पादक, रिपॅकर्सवर अन्न व औषध प्रशासनाची कडक कारवाई

खाद्य तेल उत्पादक, रिपॅकर्सवर अन्न व औषध प्रशासनाची कडक कारवाई

Subscribe

धाडीमध्ये मुंबईत एकूण २ आणि पालघर जिल्ह्यातील २ खाद्यतेल उत्पादक व रिपॅकर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली.

राज्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी लक्षात ठेवून त्यांच्या दैनंदिन आहारातील परिणामकारक अन्न पदार्थाचा दर्जा तपासण्यासाठी प्रशासन प्राप्त होणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे धाडी घालण्यात येतात. राज्यातील अन्न व्यनसायाचा दर्जा उंचावण्यासाठी त्याचप्रमाणे अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी त्याचबरोबर मार्गदर्शन करणे हा या धाडीचा मुख्य हेतू असतो. बुधवारी मुंबई आणि पालघर परिसरात काही खाद्यतेल व्यावसायिकांवर धाडी घालण्यात आल्या. या धाडीमध्ये मुंबईत एकूण २ आणि पालघर जिल्ह्यातील २ खाद्यतेल उत्पादक व रिपॅकर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मुंबईतील मे. ऑईल वेल ऑईल सेंटर, लोटस कॉलनी गोवंडी मुंबई ४३ आणि मे. जि.के.ऑईल सेंटर,जि. एम.लिंक रोड गोवंडी, मुंबई-४३ यांचा समावेश आहे. तर पालघरमध्ये मे.ओमकार ट्रेडींग कंपनी, सतावली वसई, जिल्हा पालघर, मे. शिवाय ट्रेडींग कंपनी सातीवली, वसई पूर्व जिल्हा पालघर या खाद्यतेल उप्तादकांवर कारवाई करण्यात आली. या धाडीमध्ये एकूण १३ अन्न सुरक्षा अधिकारी सामील झाले होते. या सर्व ठिकाणांहून एकूण १ करोड ६० लाख २६ हजार २५९ हजार रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर ४० खाद्यतेलाचे नमुने विश्लेषसाठी नेण्यात आले आहेत. या विश्लेषणाचा अहवाल मागवण्यात आले आहेत.

- Advertisement -

विश्लेषणासाठी नेण्यात आलेल्या ४० नमुन्यांपैकी २८ नमुने प्रमाणीत आणि १२ नमुने कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले आहेत. यात शेंगदाणा मोहरी, सुर्यफूल तेल, पामोलिन तेल यांचे नमुने कमी दर्जाचे आढळून आले आहेत. तर सोयाबिन तेल,कॉटनसिड तेल,राईस ब्रान यांचे नमुने प्रमाणीत आढळले आहेत. प्रमाणीत आढलेल्या खाद्य तेलाचा साठा तात्काळ विक्रीसाठी खुला करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर अप्रमाणीत नमुन्याबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा – महापौरांनी रस्त्यावर उतरुन केली विना मास्क फिरणाऱ्यांना विनंती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -