घरताज्या घडामोडी'कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतरच रुग्णालयातून डिस्चार्ज करा'

‘कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतरच रुग्णालयातून डिस्चार्ज करा’

Subscribe

रुग्णाची डिस्चार्जपूर्वी कोरोना टेस्ट करण्यात यावी आणि कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याशिवाय त्याला अजिबात डिस्चार्ज देऊ नये,' अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये उपचारानंतर सलग १० दिवस कोणतीही लक्षणे न दिसल्यास रुग्णाला चाचणी न करता डिस्चार्ज देण्यात यावा, अशा प्रकारची मार्गदर्शक सूचना वजा नियमावली आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे की, ‘ठाणे जिल्हयातील सर्वच ६ महानगरपालिका क्षेत्रांत बहुतांश नागरिक दाटीवाटीच्या जागेत चाळीत किंवा झोपडपट्टीमध्ये राहतात. त्यामुळे अशाप्रकारे रुग्णांना घरी सोडल्यास आणि दुर्दैवाने त्या व्यक्तीस संसर्ग असल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच रुग्णाची डिस्चार्जपूर्वी कोरोना टेस्ट करण्यात यावी आणि कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याशिवाय त्याला अजिबात डिस्चार्ज देऊ नये,’ अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

काय म्हणाले पालकमंत्री?

ठाणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ठाणे शहर आणि जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील सर्वाधिक असल्याने एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आलेल्या नव्या नियमावलीमुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, ठाणे जिल्ह्यात असलेल्या ६ महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या लक्षात घेता रुग्णाला डिस्चार्ज देतानाची नियमांमधील शिथीलता परवडणारी नाही. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच , कोरोनाचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतरच त्याला डिस्चार्ज देण्यात यावा अशा सूचना ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्तांना दिल्या. त्यामुळे यापुढेही कोरोनाग्रस्त रुग्णाची डिस्चार्जपूर्वी टेस्ट केली जाणार असून ती निगेटिव्ह आल्यानंतरच रुग्णाला सोडण्यात येणार आहे.


हेही वाचा – कोरोनाचं संकट गेल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप – चंद्रकांत पाटील


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -