घरCORONA UPDATEलॉकडाऊनमध्ये होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारावर देवाने केली कविता...!

लॉकडाऊनमध्ये होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारावर देवाने केली कविता…!

Subscribe

कोरोना आणि हे सुरु असलेले लॉक डाऊन आता लोकांना सवयीचे झाले आहे अर्थात लवकरच हे सर्व संपेल आणि  एक नवीन आनंदी सुरुवात सर्वांनाच करायला मिळेल. लोकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम मुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासाठी अभिनेता देवदत्त नागे एक विशेष कविता घेऊन आला आहे. मानसिक जाच, शिवीगाळ, अपमानकारक, हीन वागणूक, लैंगिक छळ, जबरदस्तीने शारीरिक संबंध, छेडछाड ही देखील हिंसाच आहे. त्यामुळे देवा ने अगदीच हलक्या फुलक्या अंदाजात  या लॉक डाऊन मध्ये घरात अडकलेल्या जोडप्यावर कविता केली आहे.हि स्टोरी आहे घरात अडकलेल्या एका जोडीची, खरंतर काही घरातल्या डोमेस्टिक वोईलन्सची

देवदत्त म्हणतो…..

- Advertisement -

सर्वाना माहीतेय की जगात सर्वत्र पसरला आहे कोरोना

पण आपल्या या  काही जोडीचं मात्र रोजच चालू आहे रोना नि धोना..

- Advertisement -

पण इलाज काय? ह्यांचं मॅटर म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना…

पण डॉक्टर डॉन म्हणतो हा लय महत्वाचा हाये टाईम…

जर समजून नाय घेतलं एकमेकांना, तर व्हावं लागेल दूर एकमेकांपासून टोटल   काॅरंटाईन .

आता लग्न केलंत तर प्रेम पण करायचं लय , काळजी घ्यायची भारी…

कोरोनाशी लढायची करायची एकत्र तयारी..

अहो घ्या सबुरीने सध्या,  सरकार करतेय त्यांचं काम ते आपलं काम थोडं हाये..

मग देवा भाई तुमाला पण बोलेल , श्रीखंड लय गोड हाये…

देवा भाई  बोलतो घरात नाय नडायचं , मॅटर करा सर्व क्लोज..

ही वेळ आहे एकमेकांना सांभाळायची , भांडण काय हे संपल्यावर करू शकता दररोज !

घरात रहा सेफ , कारण बाहेर पडला तो खपला..

प्रेम करा , टेक केअर करा आणि बघा झी युवा आपला !

View this post on Instagram

……….. Some times “Faded“ is “Graded” !

A post shared by DEVDATTA G NAGE (@devdatta.g.nage) on

घरगुती हिंसाचार विषयी कोणीही काहीच बोलत नसले तरीही हा विषय खरंच गंभीर आहे आणि अनेक घरात हा सुरु आहे. सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसतो. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक आणि मानसिक ञास आणि वेदना गप्प बसून सहन कराव्या लागतात. बायकांनी या गप्प बसा संस्कृतीचा आपल्या आयुष्याचा एक भाग मानला आहे. याला छेद देऊन आज पुढे येण्याची गरज आहे त्यामुळे देवा ने अगदीच हलक्या फुलक्या अंदाजात या लॉकडाऊन मध्ये घरात अडकलेल्या जोडप्यावर कविता केली आहे.


हे ही वाचा – Video – घराचा झाला सेट, कुटुंब बनलं क्रू मेंबर आणि तयार झाली मालिका!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -