घरCORONA UPDATEकसाबच्या विरोधात साक्ष देणारे श्रीवर्धनकर यांचे निधन; कुटुंबाने टाकले होते वाळीत

कसाबच्या विरोधात साक्ष देणारे श्रीवर्धनकर यांचे निधन; कुटुंबाने टाकले होते वाळीत

Subscribe

काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनकर हे मुंबईच्या फुटपाथवर निराधार अवस्थेत आढळून आले होते...

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबची ओळख पटवणाऱ्या कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या दोन गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे आजारपणात मंगळवारी सांयकाळी दुखःद् निधन झाले. कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरातील वास्तुसिध्दी इमारती मध्ये राहत होते. अन्न नागरीपुरवठा खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी होते.

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. कसाबला फाशी देण्यात ते मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. हरिश्चंद्र यांनी विशेष न्यायालयासमोर कसाबला ओळखले होते. त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती. त्यांच्या पाठीत कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईलने दोन गोळ्यादेखील घातल्या होत्या. त्यांनी आपल्या ऑफिसच्या बॅगने इस्माईलला मारले होते. काही दिवसांपूर्वी हरिश्चंद्र अत्यंत कठीण परिस्थितीत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक अडचणींतून त्यांचा सांभाळ करण्यास नकार दिला होता. त्यामुळेच ते निराधार अवस्थेत फूटपाथवर आढळले होते.

- Advertisement -

बरेच दिवस त्यांनी काही खाल्ले नव्हते. मुंबईच्या चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील डिसुझा नामक दुकानदाराने श्रीवर्धनकरांना मदत केली आणि पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशी भेट घडवली. या घटनेनंतर तातडीने गौरीपाडा प्रभागाचे भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांनी प्रभागातील देशप्रेमी, निडर, दक्ष नागरिक हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना मदतीचा हात देत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते.

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कल्याणमधील खासगी हॉस्पिटलमध्ये भेटीला आले होते. भाजपतर्फे श्रीवर्धनकर कुटुंबीयांना १० लाखांचा मदतनिधी देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते. अखेर या आजारपणामुळे मंगळवारी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे दुःखद निधन झाले.

- Advertisement -

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना एक मुलगी जावई असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी न होऊ देता सोशल डिस्टन्सिंग पाळत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी महापौर, नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दया गायकवाड आदी मोजकेच नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -