घरमुंबईघराघरांत उपचार, ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’

घराघरांत उपचार, ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’

Subscribe

राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ ठाण्यात करण्यात आला.

फास्ट फूडच्या जमान्यात जे भेटेल ते रस्त्यावरचं खात आपण आपल्या शरीराच्या आरोग्याची काळजीच घेत नाही. हे थांबवता येऊ शकते. पण, एखाद्या रोगावर उपचारांपेक्षा तो रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत घरांघरात उपचार पोहोचवणार असल्याचा निर्धार आरोग्य खात्याकडून करण्यात आला आहे.

राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये महाआरोग्य शिबिर

याच पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारपासून महाआरोग्य शिबीरे घेतली जात आहेत. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले रहावे आणि उपचार पोहोचावेत या उद्देशाने ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ हे ब्रीद घेऊन समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. सोमवारपासून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये घेण्यात येत असलेल्या महाआरोग्य शिबिराचा राज्यस्तरीय शुभारंभ ठाण्यात करण्यात आला.

- Advertisement -

आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. १६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात वृद्धांच्या सर्व आरोग्य तपासण्या, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. राज्यात १ हजार १०० आरोग्य वर्धिनी केंद्र सध्या सुरू असून ५ हजार २०० उपकेंद्रांचे रूपांतर आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये केले जाणार आहे. डायलिसीसची सुविधा, कर्करोगाची तपासणी, टेलिमेडिसीन अशा सुविधा देखील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  – एकनाथ शिंदे; आरोग्यमंत्री

या कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्हा हॉस्पिटलमधील सीटी स्कॅन सेंटरचे देखील ई-उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात, यांचा नागरिकांना लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. तसंच, आदिवासी आणि दुर्गम भागात विशेष लक्ष केंद्रीत केलं जात असल्याची माहिती प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांत ‘दंत महाआरोग्य’ शिबीर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -