घरमुंबईआरोग्यसेविकांच्या वेतनमुद्यावरुन लटकंती सुरूच; ९ हजारांवरच समाधान!

आरोग्यसेविकांच्या वेतनमुद्यावरुन लटकंती सुरूच; ९ हजारांवरच समाधान!

Subscribe

पालिकेच्या परिक्षेत्रातील आरोग्यसेविकांना सध्या पाच हजार रुपये वेतन मिळते. पण, या वेतनात वाढ करावी, अशी मागणी आरोग्येसेविकांकडून होत आहे.

पालिकेच्या परिक्षेत्रातील आरोग्यसेविकांना सध्या पाच हजार रुपये वेतन मिळते. पण, या वेतनात वाढ करावी अशी मागणी आरोग्येसेविकांकडून होत आहे. मात्र, त्यावरुन बैठका आणि चर्चाच सुरू असून पालिका ९ हजार रुपये मंजूर करेल, असे चित्र निर्माण झाले आहे. पण, किमान वेतन १५ हजार रुपयांच्या मागणीसाठी प्रयत्न राहणार असल्याचे संगल्न मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले आहे.

१५ हजार रुपये महिना वाढ करण्याची मागणी

आरोग्यसेविकांच्या वेतनवाढीसाठी संलग्न मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघाकडून सतत आंदोलने केली जात आहेत. पण, प्रशासनाकडून त्यांना चर्चेत गुंतवले जात असल्याचे आरोग्यसेविकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, आरोग्यसेविकांच्या समस्यांवरुन मोर्चा कामगार आयुक्तालयावर नेण्यात आला. त्यावेळी अशीच थातूरमातूर उत्तर दिल्याचा अनुभव आरोग्यसेविका सांगतात. यावेळी लिखित स्वरुपात पूर्तता हवी असल्याची मागणी आरोग्य सेविकांनी केली होती. महापालिका परिक्षेत्रात चार हजार आरोग्यसेविका आहेत. पण, यांना किमान वेतन अधिसूचनेप्रमाणे वेतन देण्यात येत नव्हते. शिवाय, त्यांना प्रसूती रजा, पेन्शन प्रॉव्हिडंट फंड मिळावा अशी मागणी होत आहे. तसेच, प्रसूती विषयक कायद्याप्रमाणे रजा आणि इतर फायदे न दिल्यास फौजदारी खटले पालिकेच्या अधिकाऱ्यांवर टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही, त्यांना प्रसूती रजा मिळत नाही.

- Advertisement -

आरोग्यसेविकांच्या वेतनवाढीच्या प्रश्नांवर सतत बैठका होत आहेत. प्रशासनाकडे किमान वेतनाची मागणी ठेवण्यात आली आहे. आता मात्र, किमान वेतन प्रश्नावर प्रशासन सकारात्मक दिसून येत आहे. तो अपेक्षेप्रमाणे १५ हजार रुपये प्रतिमहापर्यंत झाला नसल्यास त्या मागणीवर आम्ही ठाम राहणार आहोत.  – अॅड. प्रकाश देवदास, अध्यक्ष, संलग्न मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघ


हेही वाचा – चार तासांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल; कल्याण-डोंबिवली स्थानकावर तुफान गर्दी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -