घरताज्या घडामोडीविजयसिंह मोहिते पाटलांचा युटर्न; म्हणे, मी तर राष्ट्रवादीतच

विजयसिंह मोहिते पाटलांचा युटर्न; म्हणे, मी तर राष्ट्रवादीतच

Subscribe

लोकसभा निवडणुकीत माढाच्या मतदारसंघातील उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार विजयसिंह मोहीते पाटील हे पक्षापासून दूर गेले होते. विजयसिंह मोहीते पाटील यांचे सुपुत्र रणजीतसिंह मोहीते पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर विजयसिंह राष्ट्रवादीच्या कोणत्याही मंचावर दिसले नव्हते. त्यानंतर लोकसभा-विधानसभा निवडणुका पार पडल्या. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर आज विजयसिंह मोहीते पाटील हे वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या बैठकीत विजयसिंह मोहीते पाटील यांनी चक्क शरद पवारांबरोबर तासभर गुफ्तगू केले. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मोहीते पाटील म्हणाले की, “मी अजून राष्ट्रवादीतच आहे. माझा मुलगा भाजपमध्ये गेलेला आहे.”

‘घर फिरले कि घराचे वासेही फिरतात’, अशी एक मराठीत म्हण आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे सरकार येणे अपेक्षित होते. मात्र उद्धव ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे शरद पवारांनी कमी जागेतही चमत्कार करुन दाखवला. भाजप विरोधात जाताच भाजपने मेगाभरती केलेल्या नेत्यांमध्ये चुळबुळ सुरु झाली. विजयसिंह मोहीते पाटील यांच्या रुपाने भाजपला पहिला धक्का मिळाला आहे.

- Advertisement -

विजयसिंह मोहिते पाटील हे सध्या मी राष्ट्रवादीतच आहे, असे म्हणत असले तरी त्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत भाजपला छुपा पाठिंबा दिला. त्यामुळे लोकसभेला माढा आणि विधानसभेला माळशिरस मतदारसंघ राष्ट्रवादीला गमवावा लागला. माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. २००९ आणि २०१४ साली तिथे राष्ट्रवादीचे हणुमंत डोळस विजयसिंह मोहिते पाटलांच्या आशीर्वादाने निवडून आले होते. मात्र कर्करोगामुळे त्यांचे विधानसभा निवडणुकीआधी निधन झाले. आता माळशिरस मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला असून तिथे राम सातपुते आमदार झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -