घरमुंबईहिंदमाता, मुंबई सेंट्रलला यावर्षीही पाणी तुंबणार; स्थायी समितीच्या भाजप सदस्याचा दावा

हिंदमाता, मुंबई सेंट्रलला यावर्षीही पाणी तुंबणार; स्थायी समितीच्या भाजप सदस्याचा दावा

Subscribe

'हिंदमाता येथे काम सुरू असताना दीड कोटींचा सल्लागार कशासाठी?'

मुंबईतील हिंदमाता परिसर पुरमुक्त करण्यासाठी पालिकेने विना टेंडर १५० कोटी रुपयांचे काम करण्याची प्रक्रिया सुरू केली. आता ५०%काम पूर्ण झालेले असताना याच कामासाठी नव्याने दीड कोटी रुपयांचा सल्लागार नेमण्याचा खटाटोप का व कशासाठी केला जात आहे, असा सवाल स्थायी समितीवरील भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. पालिकेच्या आगामी बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला भाजपकडून तीव्र विरोध केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भालचंद्र शिरसाट यांनी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे विचारणा केली आहे. पालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्चूनही दरवर्षी हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी साचते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी बराच कालावधी लागतो. यावर्षीही हिंदमाता परिसर आणि मुंबई सेंट्रल परिसरात पावसाचे पाणी तुंबणार
असून पाण्याचा निचरा कित्येक तास होणार नाही. त्यामुळे हिंदमाता परिसर आणि मुंबई सेंट्रल परिसर याठिकाणी पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी होणारा ४१६ कोटींचा खर्च हा पाण्यात वाहून जाणार आहे. ही कामे सुरू झाल्यानंतर सल्लागाराला केवळ ‘कुंकवाचा धनी’ बनवण्याचा प्रकार आहे. याचा अर्थ पाणी तुंबल्यानंतर त्याचे खापर सल्लागारांच्या माथी फोडण्याचा प्रकार आहे, असे भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पुरमुक्त करण्यासाठी ४१६ कोटींचे २ पंपिग स्टेशन

दरम्यान, हिंदमाता परिसरातील पूर नियंत्रणासाठी नवीन पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी १९१.०६ गोल देऊळ, अलंकार सिनेमा, अलीभाई प्रेमजी मार्ग मुंबई सेंट्रल येथे पूर नियंत्रणासाठी नवीन पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी २२५कोटी रुपये खर्च येणार आहे. एकूणच दोन पंपिंग स्टेशन उभारणीसाठी ४१६ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी पालिका मेसर्स एनजेएस इंजिनियर्स इंडिया प्रा. लि या सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून त्याला एकूण कंत्राटकामाच्या ०.५% इतकी रक्कम म्हणजे १ कोटी ५८ लाख रुपये एवढी रक्कम मोबदला म्हणून देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -