घरताज्या घडामोडीLive Update: संजय राऊत यांच्या विरोधात न्यायालयात गेलेल्या महिलेला बोगस डिग्री प्रकरणात...

Live Update: संजय राऊत यांच्या विरोधात न्यायालयात गेलेल्या महिलेला बोगस डिग्री प्रकरणात अटक

Subscribe

संजय राऊत यांच्या विरोधात न्यायालयात गेलेल्या महिलेला बोगस डिग्री प्रकरणात अटक करण्यात आली आहे.


जागतिक बँकेच्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टच्या अहवालानुसार सन २०२०-२२ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ८.३ टक्क्यांनी वाढेल आशा

- Advertisement -


मुंबईत आज, मंगळवारी एकूण २६ हजार ९९२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ६७३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आज, मंगळवारी ६७३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील नव्याने नोंद करण्यात येणाऱ्या रुग्णांचा वेगही मागच्या दोन आठवड्यांपासून मंदावला आहे. मुंबईत आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या बाधित रुग्णांची संख्या ७ लाख १३ हजार २ इतकी आहे.

- Advertisement -


राज्यात गेल्या २४ तासात १० हजार ८९१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर सोमवारी करण्यात आलेल्या मृत्यूंच्या संख्येच्या तुलनेत बळींच्या संख्येत वाढ होऊन २९५ इतकी झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३% एवढा आहे. यासह आज १६,५७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९२५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.३५% एवढे झाले आहे.


खासगी रुग्णालयांमधील कोरोना लसीच्या दराबाबत मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. यानुसार, ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रजेनिकाच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक-व्ही या लसींसाठी खासगी रुग्णालयांना जीएसटी आणि सेवा करासहित निश्चित रकमेपेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही. कोविशिल्ड लसीला जास्तीत जास्त ७८० रुपये, कोवॅक्सिनसाठी १४१० रुपये आणि स्पुतनिक लसीसाठी ११४५ रुपये शुल्क आकारले जाऊ शकते, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.


पुणे आग प्रकरणी कंपनीचा मालक जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुण्यातील एसव्हीएस कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आग दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून आगीच्या दुर्घटनेस कंपनी मालक जबाबदार असल्याचे समोर आले आहे. एसव्हीएस या कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे मध्यवर्ती कारागृहातील १०८ कैद्यांना तसेच मेंटल हॉस्पिटलमधील १०० मनोरुग्णांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.  ठाणे महापालिकेच्यावतीने लसीकरण मोहिमेंतर्गत ४५ वर्षावरील स्वतःचे आधारकार्ड तसेच इतर कोणतेही ओळखपत्र नसलेले ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैदी तसेच मेंटल हॉस्पिटलममधील मनोरुग्ण लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.


जगभरात मोठ्या प्रमाणात मंगळवारी इंटरनेट बंद पडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क टाईम्स (NYT), सीएनएन (CNN) यांच्यासह प्रमुख आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या वेबसाइट्स आणि पोर्टल इंटरनेट सेवेअभावी ठप्प झाले आहेत. प्राथमिक अहवालात असे म्हटले की एका खासगी सीडीएन (Content Delivery Network) च्या समस्येमुळे इंटरनेटमधील तांत्रिक बिघाड समोर आला आहे.


दिल्लीत आज ३१६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद,पॉझिटिव्हीटी रेट ०.४४ टक्क्यांवर


झाडावरच्या कैऱ्या तोडल्या म्हणून शेतमालकासह सालदाराने एका अल्पवयीन मुलाला २ तास झाडाला बांधून ठेवले. त्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून तो व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यतील अंजन विहिरे गावात घडली. धक्कादायक म्हणजे, शेतमालकाने त्या मुलाच्या अंगावर लघवी देखील केली असल्याचे पीडित मुलाने आपल्या फिर्यादीत  म्हटले आहे. या  घटनेप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात शेतमालकासह सालदारावर गुन्हा दाखल झाला असून, दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास ३० मिनिटे व्यक्तिगत भेट झाल्याचे सुत्रांकडून समोर येत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर आम्ही तिन्ही नेते समाधानी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


१८ वर्षांवरील नगारिकांना मोफत लसीकरणाची घोषणा करणाऱ्या पंतप्रधानांना धन्यवाद -मुख्यमंत्री


मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा


महाराष्ट्र सदनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह


थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. मुख्यमंत्री आता महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील बैठक संपली


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यानचा फोटो


दक्षिण मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात


खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे. मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश धनुका आणि बिश्त यांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर आज हायकोर्टाने निकाल दिला.


उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हे कोरोना कर्फ्यूतून मुक्त झाले असून सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत नाईट कर्फ्यू राहणार आहे.


पाऊण तासापासून मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा सुरू


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अर्ध्यातासापासून बैठक सुरू


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचला


महाराष्ट्र सदनात न जाता मुख्यमंत्री थेट मोदींच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.


बोरिवलीत मुसळधार पावसाला सुरुवात


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत.


थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण दिल्लीत पोहोचतील.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा, तोक्ते चक्रीवादळाने केलेले नुकसान यासह इतर महत्त्वाच्या मागण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी याची भेट घेणार आहेत. याच निमित्ताने काही वेळापूर्वी  मुख्यमंत्री मुंबईहून दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील आहेत. दिल्लीच्या दौऱ्यापूर्वी काल रात्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांमध्ये वर्षा बंगल्यावर खलबतं झालं.

असा असणार मुख्यमंत्र्यांचा दौरा

सकाळी ७ वाजता: विमानाने दिल्लीकडे प्रयाण

सकाळी ९.४५ वाजता महाराष्ट्र सदन येथे आगमन

सकाळी ११ वाजता : मा पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत बैठक
स्थळ: प्रधानमंत्री निवास, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली

बैठकीनंतर सोयीनुसार मुंबईकडे विमानाने प्रयाण


मालदीवचे परराष्ट्रमंत्री शाहिद अब्दुल्ला यांची ७६व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यामध्ये १९१ सदस्यांनी मतदानात भाग घेतला होता. त्यामधील शाहिद अब्दुल्ला यांना १४३ मते मिळाली. अब्दुल्ला यांच्या विरोधात अफगाणिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री डॉ. झल्माय रसूल होते. त्यांना एकूण ४८ मत मिळाली.


जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या १७ कोटी ४३ लाख ७० हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ३७ लाख ५१ हजार जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ७६ लाख २० हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात सोमवारी १० हजार २१९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १५४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नेहमीप्रमाणे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. सविस्तर वाचा 


मुंबईत सोमवारी ७२८ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या ८६६ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ७ लाख १२ हजार ३२९ इतकी झाली आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -